कबड्डी स्पर्धेत गर्ल्स हायस्कूलचे दुहेरी विजेतेपद

इचलकरंजी :अन्वर मुल्ला 

दि .३ : जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय शासकीय मनपास्तर कबड्डी स्पर्धेत १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या दोन्ही गटांत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलने विजेतेपद पटकावत दुहेरी यश संपादन केले.

             स्पर्धेचे उद्घाटन महानगरपालिका क्रीडाधिकारी सूर्यकांत शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा अधिकारी आरती शेवाळे, क्रीडा संघटक प्रा. शेखर शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला. स्पर्धाप्रमुख भिकाजी माने यांनी स्वागत केले. श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका विद्या लोटके यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे आणि क्रीडा क्षेत्रातून आपली प्रगती साधावी, असे आवाहन केले.

          यावेळी मुख्याध्यापक शंकर पोवार, क्रीडा पर्यवेक्षक सचिन खोंद्रे, स्पर्धाप्रमुख भिकाजी माने यांच्यासह पंच सबा शेख, वैष्णवी टकळगी, आचल पाटील, श्रद्धा धुमाळ, लक्ष्मी सोनुले, मंतशा भालदार, अमर चिंदे, बी. एस. माने, ऋषिकेश लोहार, ओंकार खानाज, सुरेश बाकळे, बाळू चव्हाण, ऋतुजा अवघडी, अजय गुरव, स्नेहल कोळी, अमोल म्हेत्रे व आनंदा पोवार यांच्यासह क्रीडाशिक्षक, मार्गदर्शक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या संघांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.