श्री अतिशय क्षेत्र बाहुबली पंचकल्याणक महाेत्सवासाठी 20 काेटींचा निधी मंजूर

आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नांना यश

इचलकरंजी :विजय मकोटे 
दि.६: काेल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र असलेल्या अतिशय क्षेत्र बाहुबली येथे हाेणा
ऱ्या  
पंचकल्याणक महामहाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखाेंच्या संख्येने येणाऱ्या श्रावक-श्राविकांची साेय व्हावी यासाठी आवश्यक साेयी-सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने २० काेटी रुपयाचा विशेष निधी मंजुर केला आहे. आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला असून त्यातून परिसराच्या विकासाला यामुळे माेठी गती मिळणार आहे.
श्री अतिशय क्षेत्र बाहुबली येथे दर १२ वर्षांनी पंचकल्याणक महामहाेत्सव साजरा केला जाताे. याठिकाणी  देशभरातून लाखाेंच्या संख्येने श्रावक-श्राविका उपस्थित राहणार आहेत. हाेणारी गर्दी लक्षात घेऊन तीर्थक्षेत्राकडे येणाऱ्या हातकणंगले-नेज-कुंभाेज या मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्याचबराेबर तीर्थक्षेत्र स्थळी पिण्याच्या पाण्याची साेय, वाहनतळ आणि इतर नागरी सुविधांची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या मागणीला राज्य शासनाकडून मंजूरी मिळाली आहे.
महामहाेत्सवापूर्वी सर्व कामे उच्च दर्जाची आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल, असा विश्वास आमदार आवाडे यांनी व्यक्त केला आहे. शासनाकडून २० काेटींचा भरीव निधी मंजूरकामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीमती सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भाेसले यांचे माेलाचे सहकार्य लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.