छोटे व्यापारी, फेरीवाले यांना मुख्य रस्त्यावर दिवाळी बाजार भरविण्यास परवानगी द्यावी
इचलकरंजी : हबीब शेख दर्जी
दि: २३ : इचलकरंजी शहरामध्ये गेली ५० वर्ष पूर्वी पासून शहराच्या मुख्य रस्त्यावर दिवाळी सन निमित्य बाजार भरविण्यात येत असतो. परंतु ह्यावर्षी दिवाळी बाजार भरविण्यास मनाई करण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ इचलकरंजी महानगर पालिका नगर पथ विक्रेता समिती सदस्यांनी आज महापौर उदय धातुंडे यांना शिष्ठमंडळ भेटले व छोटे व्यापारी, फेरीवाले यांना मुख्य रस्त्यावर दिवाळी बाजार भरविण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली यावेळी विविध पर्यायावर चर्चा करण्यात आली. यावेळी महापौर यांनी शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या रोड वर बाजार भरविण्यास मा. उच्च न्यायालयांनी बंदी केली आहे असे सांगितले त्यामुळे प्रशासन सदर बाजार भरविण्यास तयार नाही अशी भूमिका मांडली यावेळी कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी, फेरीवाले संघटना अध्यक्ष दिपक पाटील यांनी कल्पना टॉकीज रोड व छत्रपती श्री. शिवाजी महाराज चौक (श्री. शिवतीर्थ) ते राजश्री छत्रपती शाहू महाराज पुतळा या रोड वर व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली. यावर योग्य तो पर्यायी मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन महापौर यांनी दिले.
दिवाळीच्या सणामध्ये ३ ते ४ दिवसामध्ये शहरासह आजू बाजूच्या ग्रामीण भागातून शेकडो व्यापारी छोटा छोटा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करीत असतात. यासाठी त्यांना १५ दिवसापूर्वी पासून नियोजन करावे लागत असते. परंतु शहरातील मुख्य रस्त्यावरील बाजार बाबत इचलकरंजी महानगर पालिका प्रशासन यांनी कोणतीच भूमिका स्पष्ठ केलेली नाही. दिवाळी बाजार साठी अवघे काहीच दिवस उरलेले आहेत त्यामुळे तात्काळ सर्व व्यापाऱ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली.
यावेळी इचलकरंजी छोटे व्यापारी, फेरीवाले संघटना अध्यक्ष सतीश नायडू, पथ विक्रेता समिती सदस्य सौ. अश्विनी कुबडगे, राकेश माळी, श्रीनिवास फुलपाटी, समीर सोलापुरे, श्रीमती सुवर्णा कुसाळे, वेणूताई पोवार, सौ. लक्ष्मी कांबळे, प्रकाश तोडकर, फेरीवाले संघटनेचे रशीद आंबी, हणमंत कांबळे, भारत चोथे, रमेश कांबळे, भरमा कांबळे, धनंजय पोवार, योगेश पोवार, अंकित गुप्ता, जाहिद जर्दी, महेश गोगीकर, रूपम कांबळे, ओंकार कांबळे, अंकुश पाटील, आमीन शेख, साहिल शेख, हणमंत करे, यांच्या सह छोटे व्यापारी, फेरीवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.