जुन्या गोष्टींबाबत उत्तरे देताना सौ. शोमिका महाडिकांची दमछाक होईल……..
गोकुळ दूध संघामध्ये एकही काम बेकायदेशीर नाही..श्रीमती अंजना केदारी रेडेकर
कोल्हापूर :प्रतिनिधी
दि.२७:गोकुळ दूध संघाच्या संचालिका सौ.शौमिका महाडिक यांनी अर्धवट माहितीच्या आधारे बेछूट आरोप केले आहेत. त्यामधून गोकुळची होणारी बदनामी आम्ही खपवून घेणार नाही. आमचे नेते ग्रामविकास व कामगार मंत्री नामदार हसन मुश्रीफसाहेब, गृह राज्यमंत्री व पालकमंत्री नामदार सतेज उर्फ बंटी पाटीलसाहेब यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघाची धुरा आमच्याकडे आली. कारभार पारदर्शी व स्वच्छ कसा होईल,याकडेच आम्हा सर्वांचा कटाक्ष असतो. प्रत्येक खरेदी – विक्री सेवा याबाबत निविदा काढून संघाचा फायदा कसा होईल,हे आम्ही पाहतो.
नवीन संचालक मंडळाने मुंबई वाहतूक टँकर भाडे कपात, अतिरिक्त रोजंदारी कर्मचारी कपात, तसेच महानंदला दिलेले दूध पॅकिंग या माध्यमातून वार्षिक सरासरी दहा कोटींची बचत केली आहे. मागील संचालक मंडळाने दिलेला पशुखाद्य वाहतुकीचा ठेका प्रति मे.टन ७०३ रुपये होता. तर, या संचालक मंडळाने दिलेला वाहतुकीचा ठेका प्रति मे.टन ५३६ रुपये आहे. या पद्धतीने प्रति मे.टन १६७ रुपये बचत होऊन, डिसेंबर २०२१ अखेर एकूण ०१ कोटी १६ लाख रुपयेची बचत झाली आहे. पशुखाद्याच्या आधी केलेल्या नियोजनामुळे २,५०० मे.टन इतकी प्रती महिना मागणी वाढली असून, त्याचा पुरवठा करणे श्री.विठ्ठल रखुमाई सहकारी वाहतूक संस्था मुरगुड व शिवराज ट्रान्सपोर्ट संस्थेस शक्य झाले नाही. त्यामुळे, त्याच दरामध्ये राधानगरी तालुका वाहतूक सहकारी संस्थेकडून काम करून घेतले आहे. यामध्ये कोणती चूक झाली ? या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे दूध संघाचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही.उलट या निर्णयामुळे दूध संस्थाना त्यांच्या मागणी प्रमाणे वेळेत पशुखाद्य पुरवठा करणे शक्य होणार आहे.
गोकुळ दूध संघाचे प्रती दिन संकलन मागील काळामध्ये १३ लाख लिटर होते. ते आमच्या काळामध्ये दूध उत्पादकांच्या पाठबळावर व आम्हा सर्वांच्या प्रयत्नाने सरासरी १७ लाख लिटर्स पर्यंत वाढले असून. लवकरच २० लाख लिटर्स संकलनपुर्तीच्या अमृत कलशाचे पूजनही करणार आहोत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.