श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक घेऊ

पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे

कोल्हापूर प्रतिनिधी

दि 29 जानेवारी  पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन मंदिर परिसराची पाहणी केली. तसेच मंदिर परिसराचे सुशोभीकरण, अन्नछत्र, भक्त निवास व्यवस्थेविषयी माहिती घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, या मंदिराची वास्तू शिल्प कला अप्रतिम आहे. श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा व यानुषंगाने अन्य बाबींबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक घेण्यासाठी प्रयत्न करु, असे त्यांनी सांगितले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.