अनुकंपा यादीतील नऊ उमेदवारांना अनुकंपा तत्वावर पोलिस शिपाई म्हणून कोल्हापूर पोलिस दलात समावेश
पोलिस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे यांचे हस्ते दिली नियुक्ती पत्रे
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि .१ फेब्रुवारी : आज पोलिस अधीक्षक कार्यालयात अनुकंपा यादीतील नऊ उमेदवारांना अनुकंपा तत्वावर पोलिस शिपाई म्हणून कोल्हापूर पोलिस दलात सामावून घेण्यात आले.
त्यामध्ये शाहूपुरी पो स्टे चे कर्तव्यदक्ष पोलिस अंमलदार म्हणून विशेष ओळख असणारे स्व. अशोक पाटील यांच्या मुलाचा देखील समावेश आहे. मागील सहा महिन्यात पोलिस शिपाई पदाच्या अनुकंपा प्रतिक्षयादीतील 100% जागा भरण्यात आल्या असून 26 उमेदवारांची पोलिस शिपाई म्हणून अनुकंपा तत्वावर नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच 6 लिपिक आणि 1 कार्यालयीन शिपाई यांना देखील अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामावून घेतले आहे. यामध्ये अमोल जगन्नाथ पाटील, श्रीमती मनीषा विजय घाटगे , श्रेयश दिलीप संकपाळ , यश संजित जगताप, अभिषेक अशोक पाटील, रोहीत रविंद्र शिंदे,शंतनु प्रकाश देसाई, अपूर्वा आकाश व्हरबळे, शुभम शामराव परिट या उमेदवारांना नियुक्ती पत्र मा पोलिस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे यांचे हस्ते देण्यात आले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.