छत्रपती संभाजीराजेंचा ‘गोकुळतर्फे’ सत्कार

कोल्‍हापूरः प्रतिनिधी

दि.१२. सकल मराठा समाजाच्‍या विविध प्रलंबित मागण्‍यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी २६ फेब्रुवारी २०२२ इ. रोजी मुंबर्इतील आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले होते. सकल मराठा समाजाच्‍या प्रमुख मागण्‍या राज्‍य शासनाकडून मान्‍य करून घेतल्‍याबद्दल खासदार छत्रपती संभाजी राजेंचा सत्‍कार गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील व संचालक मंडळाच्या वतीने करण्‍यात आला.

यावेळी राजेंनी संचालक मंडळाबरोबर मराठा समाजाच्या विविध प्रलंबित असलेल्या विषयावर चर्चा केली.

यावेळी गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील (आबाजी), माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले,नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अमर पाटील उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.