श्री दत्त साखर कारखाना ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्र शिरोळ येथे 1 एप्रिल रोजी मोफत आरोग्य शिबीर!!

शिरोळ  विजय धंगेकर

दि:३०शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते ,श्री दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार माजी आमदार स्व सा रे पाटील साहेबांच्या 7 व्या स्मृतिदिनानिमित्त श्री दत्त आरोग्य केंद्र कारखाना कार्यस्थळावर शुक्रवार दि 1 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 ते साय. 5 वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर संपन्न होणार आहे.

स्व सा रे पाटील साहेबांनी शिरोळ तालुका,सीमाभाग व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी व निरामय आरोग्यासाठी दूरदृष्टीने श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर सर्व सोईसुविधानेयुक्त सुसज्ज हॉस्पिटलची उभारणी 1989 साली केली. विद्यमान चेअरमन श्री गणपतराव पाटील दादांच्या मार्गदर्शनाखाली व चीफ मेडिकल ऑफिसर डॉ रेखा शेरबेट मॅडमांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त आरोग्य केंद्राची यशस्वी घोडदौड सुरु आहे. या सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे उदघाटन सांगली येथील सुप्रसिद्ध सर्जन व कॅन्सर तज्ञ डॉ विकास गोसावी यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री गणपतराव पाटील दादा तर प्रमुख पाहुणे म्हणुन व्हा चेअरमन श्री अरुणकुमार देसाई असणार आहेत.यावेळी संचालक, विभागप्रमुख व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आरोग्य शिबिरात चीफ मेडिकल ऑफिसर डॉ रेखा शेरबेट एम डी( छातीरोग- दमा- धाप साखर तज्ञ) यांच्या नियोजनाखाली विविध स्पेशालिस्ट डॉक्टर्स उपस्थित राहुन नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहेत.त्यामध्ये डॉ विकास गोसावी सर्जरी व कर्करोग, डॉ गजानन चौगुले ऑर्थोपेडिक सर्जन, डॉ प्रिया खाडे व डॉ राजेंद्र डिग्रजे स्त्रीरोग व प्रसुती विभाग, डॉ अभिजित पाटील युरोलॉजी, डॉ शिरीष रणभीसे नेत्ररोग, डॉ वसुंधरा घोडके दंतरोग, डॉ सचिन पुजारी व डॉ विक्रम जैन कान नाक घसा तज्ञ, डॉ भावेश शहा व डॉ विजय कुरडे बालरोगतज्ज्ञ,डॉ दयानंद नाईक त्वचारोग, डॉ बी एस भोसले होमिओपॅथी कॅन्सर तज्ञ, डॉ कुमार पाटील (जनरल) इ डॉक्टर्स उपलब्ध असणार आहेत. तरी या आरोग्य शिबिराचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा.सदर शिबिरात सहभागी नागरिकांना वर्षभर ऑपरेशन व औषध खर्च सोडुन इतर उपचार, तपासणी खर्चावर 10%सुट देण्यात येणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य केंद्राच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ रेखा शेरबेट, ट्रस्टचे डायरेक्टर श्री अंबाप्रसाद नानिवडेकर व एक्स ऑफिसीओ ट्रस्टी श्री एम व्ही पाटील यांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.