आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील सामान्यज्ञान चाचणी स्पर्धेत चैतन्या आणि अक्षता प्रथम क्रमांकाच्या मानकरी
देवरुख:
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने ‘जागतिक युवा कौशल्यदिनाच्या’ निमित्ताने आयोजित केलेल्या’आकांक्षा’ या वार्षिक अंकावर आधारित सामान्यज्ञान चाचणी(प्रश्नमंजुषा स्पर्धा) स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयात प्रकाशित करण्यात आलेल्या या विशेष अंकात ‘गाऊ त्यांना आरती’ या सदरात स्वातंत्र्योत्तर भारतात निरनिराळ्या क्षेत्रात उच्चपदी पोहोचलेल्या ७५ स्त्री-पुरुषांच्या चरित्रावर आधारित ही सामान्यज्ञान चाचणी होती.सामान्य ज्ञान चाचणीचा निकाल खालील प्रमाणे प्रथम क्रमांक चैतन्या तेंडोलकर आणि अक्षता भाट्ये(दोघींना विभागून),द्वितीय क्रमांक किरण टक्के तृतीय क्रमांक अनुराधा भुरवणे,साक्षी कांबळे,काजल गवळी आणि प्रणिता चौधरी(चौघीना विभागून).या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सीमा कोरे,प्रा.मंजुश्री भागवत,प्रा.संदीप मुळ्ये,प्रा.सुनील वैद्य, प्रा.स्वप्नाली झेपले,प्रा.देवयानी जोशी,अक्षय भुवड यांनी मेहनत घेतली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत,नेहा जोशी, कुमार भोसले,शिरीष फाटक,ॲड.वेदा प्रभुदेसाई,प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर,उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील,पर्यवेक्षक प्रा. एम.आर.लुंगसे,ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी सहभागी व यशस्वी विद्यार्थी आणि आयोजक शिक्षकांचे कौतुक केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.