राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर यांची गोकुळ ला सदिच्छा भेट

कोल्‍हापूर: प्रतिनिधी

दि.२५. जुले : राज्यस्तरीय लेखा समिती,पुणे(महाराष्ट्र शासन) चे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) दूध संघास सदिच्‍छा भेट दिल्‍याबद्दल गोकुळचे अध्‍यक्ष  विश्वास पाटील यांच्‍या हस्‍ते व कार्यकारी संचालक, अधिकारी यांच्या उपस्थितीत गोकुळ प्रकल्प येथे सत्‍कार करण्‍यात आला.

यावेळी बोलताना राज्‍यस्‍तरीय लेखा समितीचे अध्‍यक्ष शहाजीराव क्षीरसागर म्‍हणाले कि गोकुळ हा महाराष्ट्रातील आदर्शवत सहकारी दूध संघ असून गोकुळने आपल्या गुणवत्तेचा जोरावर  पुणे,मुंबई तसेच राज्यातील इतर शहरात  व्यवसाय वृंधिगत केला आहे. महाराष्ट्रातील इतर सहकारी संस्थांनी गोकुळच्‍या कामकाजाचा आदर्श घेण्यासारखे आहे असे मत त्यांनी  व्यक्त केले.

यावेळी संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्‍हणाले कि दूध उत्पादक शेतकरी व ग्राहक यांना केंद्रबिंदू मानून संघाचे कामकाज चालते. संघाबद्दल असणारी दूध उत्पादक शेतकऱ्यांची आस्था हीच गोकुळच्या प्रगतीचे मुख्य कारण आहे व संघाचे दैनंदिन कामकाज कशा प्रकारे चालते याची सविस्तर माहिती दिली.

यावेळी संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील, शहाजीराव क्षीरसागर अध्यक्ष –राज्यस्तरीय लेखा समिती,पुणे महाराष्ट्र शासन,राहुल देवकर,जुबिन शिकलगार,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, व्‍यवस्‍थापक प्रशासन श्री.डी.के.पाटील, व्‍यवस्‍थापक वित्त हिमांशु कापडिया, सहा. व्‍यवस्‍थापक प्रशासन रामकृष्ण पाटील संघाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.