संगमेश्वरात पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत समुह राष्ट्रगीत गायन
संगमेश्वर:-
देशाच्या अमृत महोत्सवाच्या सांगता दिनी संगमेश्वर मध्ये विविध ठिकाणी नागरिक व पोलीस अधिकारी तसेच पक्षाचे व संस्थांचे पदाधिकारी व व्यापारी बंधू भगिनी समूह राष्ट्रगीत ठीक ११.०० वाजता सोनवी पुलाच्या लगतचा चौक, आठवडा बाजार इत्यादी ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने देशाच्या सन्मानार्थ माननीय पोलिस अधिकारी व पोलीस निरीक्षक उदय झावरे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण देशमुख यांच्या उपस्थितीत समूह राष्ट्रगीत गायले गेले.
यावेळी संगमेश्वर निढळेवाडी येथील प्रसिद्ध युवा गायिका कुमारी गौतमी वाडकर यांनी देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थित नागरिकांची मने जिंकली.यावेळी उपस्थितांसमोर कुमारी गौतमी अजय वाडकर यांचा गुलाब पुष्प देऊन महिला पोलीस अधिकारी विजया तांबडे (A.S.I) पोलीस अंमलदार पंदेरे यांचे शुभहस्ते करण्यात आला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.