छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सामाजिक संस्थेला खंडाळा अर्बन मध्ये श्रींच्या आरतीचा मान

 

रत्नागिरी

गेली ८ वर्ष रत्नागिरी जिल्हामध्ये सामाजिक क्षेत्रात अविरतपणे काम करणा-या छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांना खंडाळा अर्बनचे चेअरमन निवृत्ती खारवटकर, मुख्याधिकारी वृषभ खारवटकर यांनी दि. ०३ सप्टेंबर २०२२ रोजी खंडाळा अर्बन येथे निमंत्रित करुन श्रींच्या आरतीचा मान दिला.

श्रींची आरती छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे संस्थापक / अध्यक्ष सुनिल धावडे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर खंडाळा अर्बन कडून छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेला प्रतिमा भेट दिली. यावेळी उपस्थित मान्यवर छावा प्रतिष्ठान चे सचिव समिर गोताड, खजिनदार गणेश कांबळे, कार्याध्यक्ष संतोष आग्रे,संघटक समिर धावडे, सोशल मिडिया प्रमुख संगम धावडे, प्रवक्ता नितिन रोडे, प्रसिध्दी सचिव नंदकुमार धावडे, सल्लागार मोहन पवार, सदस्य रितेश धावडे, संदेश धावडे, सचिन धावडे, राहुल धावडे, निलेश कळंबटे, प्रविण रोडे, प्रशांत कांबळे, चंद्रकांत गोताड, सुर्यकांत गोताड, हरिश्चंद्र गोताड, प्रथमेश कांबळे, प्रकाश गोताड, खंडाळा अर्बन चे मुख्याधिकारी वृषभ खारवटकर, व्यवस्थापक आदिती नेवरेकर, श्रावणी पांचाळ, निरंजन महाकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.