Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
इचलकरंजी : विजय मकोटे
दि ९ :कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट अँड इंटींग्रेटेड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी ) च्या तारदाळ -हातकणंगले येथील 210 एकर जागेत 85 युनिट असताना प्रत्यक्षात 95युनिट उभारण्यात आले आहेत. प्रत्यक्ष उत्पादन सुरु असून येथील उत्पादित कापड परदेशात एक्स्पोर्ट होत आहे. आवश्यक त्या सुविधा लवकरच पूर्ण करून दिल्या जातील, असे संस्थेचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांनी सांगितले.
कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट अँड इंटींग्रेटेड टेक्स्टाईल पार्क या संस्थेची 16 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून चेअरमन श्री. दत्तवाडे बोलत होते. यावेळी सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे, जि. प. सदस्य डॉ. राहुल आवाडे यांची यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार प्रकाश आवाडे यांनी, केएटीपीचा देशातील अत्याधुनिक पार्कमध्ये समावेश होतो. यशस्वी उद्योजक कसे यश मिळवतो याचे हा प्रकल्प उत्तम उदाहरण आहे. अत्यंत अडचणीतून मार्गक्रमण करीत हा प्रकल्प आज हायटेक केंद्र म्हणून ओळखला जात आहे. 240 कोटी रुपये खर्चाच्या इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टर या महत्त्वकांक्षी प्रकल्पात गुंतवणूक केली असून भविष्यात हा प्रकल्प वस्रोद्योगाला नवी दिशा देणारा ठरेल. लवकरच केएटीपी येथे आवश्यक पायाभूत सुविधासाठीचे टेंडर काढून त्याची पूर्तता केली जाईल, असे सांगितले.
नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक निशिकांत सावर्डेकर यांनी केले. सर्व विषयांना सभासदांनी एकमतानी मंजुरी दिली. सभेस अहमद मुजावर, एम. के. कांबळे, आनंदराव नेमिष्टे, राजाराम बोगार्डे, महेश सातपुते, आदगोंडा पाटील, रमेश कबाडे, नरसिंह पारीक, बाळासाहेब माने, महावीर कुरुंदवाडे, बंडोपंत लाड, शेखर शहा, शंकर येसाटे, सर्जेराव पाटील, सुरेश बावणे, शकुंतला जाधव, सौ. सुवर्णा पाटील आदिसह सभासद उपस्थित होते. आभार व्हा. चेअरमन बाळासाहेब कलागते यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अनिल चांदणे यांनी केले.
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.