सेवा पंधरवडा निमित्त भाजपा युवा मोर्चा रक्तदान शिबिरास वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांची भेट..
इचलकरंजी : हबीब शेख दर्जी
दि. २५ सप्टेबर : माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीने सेवा पंधरवडा साजरा करायचे ठरवले आहे त्याचाच भाग म्हणून इचलकरंजी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, हेमंत वरूटे युवा मंच आणि अश्विनी कुबडगे रणरागिणी प्रेरणा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने नारायण टॉकीज जवळ भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला होते. या शिबिराचे उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री, उच्च शिक्षण तंत्रज्ञान मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाले, एका रक्तदान शिबिराला राज्याचा कॅबिनेट मंत्री स्वतःभेट देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवतात यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तसेच असे अनेक ठिकाणी स्वच्छता अभियान व शरद पाटील युवा मंच तर्फे रक्तदान शिबिर असे कार्यक्रम इचलकरंजी भाजपा करीत आहेत.
सदर या रक्तदान शिबिरास नागरिकांचा चांगला सहभाग लाभला. रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी हेमंत वरुटे, सौ.अश्विनी कुबडगे, मयूर दाभोळकर, राकेश कोतमिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी शहराध्यक्ष अनिलजी डाळ्या, युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण पाटील, वैशाली नायकवडे, महिला अध्यक्ष सौ.पूनम जाधव, धोंडीराम जावळे, सतीश पंडित,अरुण कुंभार, अरविंद शर्मा, अमर कांबळे, अरविंद चौगुले, उत्तमसिंग चव्हाण, किसन शिंदे, महादेव हाळवणकर, शशिकांत मोहिते, इम्रान बागवान, प्रतिम बोरा,अर्जुन शिंदे, ऋषभ जैन, शुभम बरगे, सतीश गावकर, सुजय पवार, काशिनाथ पुजारी, शुभम भोसले, सौ.प्रति रुग्गे, सौ.अनिता कुरणे, सौ.पूनम भोसले, आशिष खंडेलवाल, सागर शिवलिंगे, अतुल पळसुले, प्रशांत काळे, सिदार्थ सूर्यवंशी, भगवान बरगाले, सचिन माळी, बाबासाहेब कोरे, शंकर झित्रे, उमेश गोरे, विपुल खोत, फिरोज बांगी, तानाजी भोसले, संजय नागुरे,अशोक साळुंखे,मोहन कुंभार, बाबासाहेब गाडेआदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.