यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना शरद पवारांनी केलं अभिवादन
कराड:प्रतिनीधी
दि:०३:जुलै:शरद पवार यांनी प्रीतीसंगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना केलं अभिवादन केलं आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे, अंकुश काकडे आणि मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत
प्रीतीसंगमावर बोलताना म्हणाले शरद पवार महणाले यशवंतराव चव्हाण यांनी नवी पिढी तयार केली. जिल्ह्या जिल्ह्यांत तरुणांचा संच उभा केला. सत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी अखंड काळजी घेतली. आज यशवंतराव चव्हाण आपल्यात नाही आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी दिलेला विचार आपल्यात आहे. त्या विचारांनी पुढे जाण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली आहे. आज महाराष्ट्र आणि देशात जात, धर्म आणि पंताचा आधार घेऊन संघर्ष निर्माण केला जातोय,” असं शरद पवारांनी सांगितलं.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.