पार्क केलेल्या कारला लागली अचानक आग ,आगीत कार जळून खाक

कबनुरातील घटना ,परिसरात एकाच खळबळ

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी 

दि .२१  ; कबनुरात  दुपारी एका कारला  अचानक आग लागली .आणि  बघता बघता कार आगीत जाळून खाक झाली .सदरची घटना कब नूर हद्दीतील कोनूर पार्क येथे घडली.घटना स्थळी शिवाजी नगर पोलिस व इचलकरंजी महानगर पालिकेचे अग्निशमन पथक हजर झाले .त्यांनी आग विझ वण्याच्या  प्रयत्न केला .सुदैवाने यात कोणतेही जीवित हानी झाली नाही .

या बाबत अधिक माहिती अशी कि  हर्षद वाघमारे हे पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करीत आहेत. त्यांनी दोन वर्षापूर्वी नवीन  कार खरेदी केली आहे. ते बुधवारी दुपारी चंदूर (ता. हातकणंगले) येथे कंपनीच्या कामानिमित्याने कार मधून जात होते. यावेळी त्यांची कार कबनूर येथील  कोन्नूर पार्क समोर अचानक बंद पडली. त्यामुळे त्यांनी कार पार्कमधील रस्त्यावर उभी केली. कार मधील पेट्रोल संपून कार बंद पडली असावी. या शक्यतेने ते मित्रासमवेत दुचाकीवरुन पेट्रोल आणण्यासाठी पेट्रोल पंपावर गेले. पेट्रोल घेवून येताच त्यांना कार मधून धूर बाहेर येवू लागल्याचे दिसून आले. त्यांनी कारचा दरवाजा उघडून धूर कोठून येतो आहे. यांची पाहणी करु लागले. तोपर्यंत कारच्या इंजिनमधून आगीच्या ज्वाला बाहेर येवू लागल्या. त्यांनी प्रसंगासावधान राखून कारपासून बाजूला झाले. या घडल्या घटनेची माहिती पोलिसांना आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन पाण्याचे बंब त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानानी आग त्वरीत आटोक्यात आणली. पण तोपर्यंत संपूर्ण कार आगीत जळून खाक झाली. त्यामुळे घटनास्थळी फक्त कारचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली आहे यांची नोंद पोलिसात झाली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.