21 दिवसाच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी खा. विनायक राऊत कडवईत
कडवई –मुजीब खान
कडवई ता.संगमेश्वर येथील चंद्रकांत जाधव कुटुंबीयांच्या घरी २१ दिवसाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी रत्नागिरी सिंधूदुर्गचे खासदार व शिवसेना सचिव विनायक राऊत गुरुवारी रात्री कडवई पाटील वाडी येथे आले.
मागील २१ वर्षापासून जाधव कुटुंबीयांच्या घरी २१ दिवसाच्या गणपतीची स्थापना केली जाते. सलग तीन वर्षे रत्नागिरी सिंधूदुर्ग खासदार विनायक राऊत हे याठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी खासदार यांनी स्वत: याठिकाणी भजन गायले.समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्रशिस्थी पत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र कडवईचे डाॅक्टर्स,नर्सेस,व कर्मचारी वर्गाला तसेच कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक वर्गाला यावेळी गौरविण्यात आले. कडवईतील सुप्रसिध्द डॉ. अन्सार जुवळे यांना कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याने गौरविण्यात आले.
यावेळी खासदार विनायक राऊत यांच्या सोबत मा.आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळके, राजेंद्र महाडिक, रोहन बने,संतोष थेराडे,दिलीप सावंत उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.