कडवईतील दोन्ही कॉलेज मध्ये १२ वी बोर्डाच्या परीक्षेत मुलींची बाजी

कडवईतील दोन्ही कॉलेज मध्ये १२ वी बोर्डाच्या परीक्षेत मुलींची बाजी

कडवई :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यंदाचा ए.ई.कालसेकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कडवई बारावीचा निकाल ९५.०० टक्के इतका लागला आहे. तर भाईशा घोसाळकर कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य शाखा १०० टक्के व कला शाखा ८९.४८ टक्के निकाल लागला आहे.या निकालात मुलींनी बाजी मारली असून, काळसेकर कॉलेज सायन्स मध्ये कौसर कारागीर हिने ८६.६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तसेच भाईशा घोसाळकर कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य शाखा साक्षी साळुंखे ८७.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक व कला शाखा अंकिता पंडित ९१.१७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.