कबनूरमध्ये इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्थेची ४९ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न
कबनूर :हबीब शेख दर्जी
दि २८ येथील इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्था लि. कबनूरची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या मंगल कार्यालयात खेळीमेळीत पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन दिलीप झोळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी चेअरमन पांडुरंग राजमाने, राजाराम पोवार व मारुती वाशीकर उपस्थित होते.
उपाध्यक्ष अशोक वसगडे यांनी स्वागत केले. यावेळी जेष्ठ नेते व सभासद कै. सुधाकरराव मणेरे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. संचालक बाळासो ऐनापूरे यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. सेक्रेटरी शिवय्या जंगम यांनी नोटीसवाचन केले.
चेअरमन दिलीप झोळ यांनी प्रास्ताविक करताना अहवाल सादर केला. ते म्हणाले की, संस्थेची सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरु आहे. यावर्षी मंगल कार्यालय व जेवण विभागाचे नूतनीकरण करण्यात आले असून सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तू देण्यासाठी ३ लाख ३० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या प्रसंगी माजी चेअरमन पांडुरंग राजमाने व राजाराम पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच संस्थेच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला संचालक अनिल कुलकर्णी, सुरेंद्र मगदूम, महंमदयुनुस खतीब, रामचंद्र भोसले, नसीर सर्जेखान, रविंद्र सावंत, सुधाकर ताडे, दत्तात्रय भिलवडीकर, सुरेश कुंभार, सौ. सुनिता शिंगाडे, सौ. विजयमाला जाधव, मारुती वाशीकर, प्रमोद गुळंबे आदींसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन संचालक विशाल दास यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक विक्रांत दानोळीकर यांनी मानले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.