राजीवली शाळा नं.१ मधे राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त स्वागत समारंभ व निरोप समारंभ मोठ्या उत्साहात साजरा
आरवली:(सचिन पाटोळे)
संगमेश्वर तालुक्यातील राजीवली शाळा नंबर १ मधे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक संतोष शिंदे सर व श्री अमर खोत सर यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

याच वेळी नवीन शिक्षक चव्हाण सर नवीन मुख्याध्यापक पाटील सर, बगाड सर यांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.विशेष म्हणजे केंद्रातील केंद्रप्रमुख पवार सर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्रथम राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सचिन पाटोळे आणि सचिन कदम यांनी शिंदे सरांनी पाच वर्षात केलेल्या सेवेचे भरभरून कौतुक केले तसेच शाळेला चांगले सहकार्य शिंदे सरांनी केले असे मनोगत व्यक्त केले.त्याचप्रमाणे खोत सरांविषयी सुद्धा कृतज्ञता व्यक्त केली. याचवेळी पुढील एक वर्षासाठी व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली यामध्ये सर्वानुमते श्रीयुत सचिन रमेश पाटोळे यांची अध्यक्ष म्हणून तर श्रुती सुरेंद्र पाटोळे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

दिनांक 26 जून 2024 रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा राजीवली नंबर १ या शाळेमध्ये श्री शिंदे सर व खोत सर यांना त्यांचे बदली झाल्यामुळे सदिच्छा निरोप देण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व गावच्या उपसरपंच माननीय सौ दीपिका सावंत, पत्रकार श्री सचिन पाटोळे,माजी अध्यक्ष सचिन कदम, ग्रामपंचायत सदस्य शैलेश घाडगे, ग्रामपंचायत सदस्या प्रतिभा सोलकर,श्री लक्ष्मण कदम, राजेंद्र जाधव ,संतोष कदम,त्याचप्रमाणे व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ श्रुती पाटोळे, जानवी पाटोळे अंगणवाडी शिक्षिका सोनाली कदम, सौ घाडगे,सौ संजना मालप यांच्यासहित बहुसंख्या ग्रामस्थ पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन सचिन पाटोळे,दिपीका सावंत व त्यांच्या सर्व सहकारी सदस्य यांनी उत्तम प्रकारे केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील शिक्षक श्री चव्हाण सर यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर यांनी केले तसेच उपस्थित सर्वांचे आभार श्री बगाड सर यांनी मानले.
श्री शिंदे सरांनी मनोगत व्यक्त करताना सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त केले तसेच शालेय कामकाज करताना राजीवलीचे ग्रामस्थ आपल्या पाठीशी असल्यामुळे आपण उत्तम काम करू शकलो असे मत व्यक्त केले आणि सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.