कोल्हापुरात मुश्रीफांच्या आदर्शला सतेज किनार
माजी महापौर सुनील कदम यांचा मंत्री मुश्रीफ यांच्यावर पत्रकार बैठकीत निशाणा
- कोल्हापूर : प्रतिनिधी
दि.५ ऑक्टोंबर :कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीचा ई वॉर्ड मधील रि.स.नं. ८७४ हा जागा मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करून .संगमताने लाटली आहे . सदर गैर व्यवहारा ची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माहीती माजी महापौर सुनील कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली या बैठकीला सत्यजित कदम उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या मालकीचर ई वॉर्ड मधील रि.स.न. ८७४ मधील रमणमळा तलाव सन २००० साली ज्ञानशांती कंपनी यांना पर्यटन विकासाकरिता २० वर्षाकरिता भाडेतत्वावर पर्यटन केंद्र म्हणून वापराकरिता दिला होता. सदर रि.स.नं. ८७४ चे क्षेत्र १ हेक्टर ८५ आर इतके आहे.रि.स.नं. ८७४ ला लागून रि.स.नं. ८७५ हे क्षेत्र असून यातील पश्चिमेला तसेच दक्षिणेला रि.स.नं. ८७५ हि मिळकत आहे. रि.स.नं. ८७४ च्या दक्षिणेकडील बाजूस जयसिंग घोरपडे यांच्या मालकीचे ८१ गुंठे इतके क्षेत्र होते यात सन १९८१ साली फायनल लेआऊट झाला आहे. सदरचे क्षेत्राबाबत घोरपडे यांनी नागरी जमीन कमाल धारण कायद्याखाली विवरण पत्र भरले असून सदर विवरण पत्रानुसार केवळ ३ गुंठे इतके क्षेत्र उदयसिंह घोरपडे यांच्या नावे अतिरिक्त दिसत आहे. घोरपडे यांनी सदर मिळकतीतील सर्व क्षेत्र हे विक्री केलेले आहे तसेच अतिरिक्त क्षेत्र हे १०(३) होऊन शासन जमा झालेले आहे. व त्यांच्या नावे ७/१२ पत्रकी कोणतेही क्षेत्र शिल्लक दिसत नाही.सन २००४ चे सुमारास मा. नाम. हसनसो मियालाल मुश्रीफ यांनी त्यांचे चिरंजीव साजिद हसनसो मुश्रीफ यांच्या नावे विकसन करारपत्र व वटमुख्त्यार पत्र करून घेतले. सदर आधारे स्वतःच्या राजकीयपदाचा भ्रष्ट पद्धतीने गैरवापर करत सन २००५ साली सदर मिळकतीबाबत पुनर्विलोकन कार्यवाहा नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई येथून सदर मिळकती मध्ये अतिरिक्त क्षेत्रास तळेगाव दाभाडे योजना मंजूर करून आणली. मुळात १० (३) खाली कारवाई झालेली जमीन हि मूळ मालकास परत देणेबाबत तरतूद नसताना सदर कारवाई कशी झाली याबाबत संभ्रम आहे. याउपर मुळातच तीन गुंठे इतके क्षेत्र अतिरिक्त असताना ८६२.०५ चौ.मी. इतके क्षेत्र असल्याचे भासवून अगर दाखवून ७/१२ पत्रकी मूळ मालकांचे नाव नसताना हस्तलिखित ७/१२ मध्ये स्वतः मूळ मालकांचे नावे लिहून राणोजी व उदयसिंह घोरपडे हे दोनच हिस्सेदारांच्या सहीने तीन हिस्से वटमुख्त्यार करून घेतल्याचे दिसून येते.सदर मिळकतीवर आजमितीस कल्पतरू नावाची बहुमजली इमारत उभारली असून यातील बहुमतांशी सर्व सदनिका या साजिद हसन मुश्रीफ यांच्या नावे असून अन्य काही सदनिका या बेनामी नावाने तबदील केल्याचे समजून येते.
सदर मिळकतीचे ७/१२ पत्रकी मूळ मालक यांची नावे शिल्लक नाहीत असे स्पष्टपणे व ठोसपणे म्हणण्याचे कारण म्हणजे क्र. हक्कनोंद/एसआर/वशि/२९४२/२०१३ तहसीलदार कार्यालय, करवीर दिनांक २५/१०/२०१३ चा आदेश असून सदरचे कामी सर्व कारवाई हि साजिद हसन मुश्रीफ यांनी केलेल्या कार्यवाही वरून समजून येते.इतके सगळे उपद्व्याप करून भूक भागली नाही म्हणून मूळ जागामालक घोरपडे यांच्याकडून मिळालेल्या वटमुख्त्यार पत्राआधारे पूर्वी कधीही तक्रार नसताना महानगरपालिकेतील सत्ता व राजकीय ताकदीवर महानगरपालिकेलाच रि.स.नं. ८७४ चा मोजणीचा अर्ज देऊन रि.स.नं.875 मधील अतिरिक्त क्षेत्र आहे तसेच रि. स.नं. ८७३ मधील क्षेत्राचे अतिक्रमण रि.स.नं. ८७४ मध्ये आहे असे दाखवण्यात आले. व याप्रकारे रि.स.नं. ८७५ मधील ५६ गुंठे इतके क्षेत्र रि.स.नं. ८७४ मध्ये दाखवून त्यातील १५.१२.६५ चौ.मी. इतके क्षेत्र हे मूळ जागामालक राणोजी घोरपडे यांच्या नावे वटमुख्त्यार पत्र धारक म्हणून साजिद हसन मुश्रीफ यांनी नकाशा तयार करून कब्जेपट्टी बनवून ७/१२ पत्रकी नावे दाखल केली. मुळात सन १९८१ साली क्षेत्रमेळ बसवून फायनल लेआऊट झाल्यांनतर घोरपडे यांच्या मालकीचे क्षेत्र रि.स.नं. ८७४ मध्ये क्षेत्र अतिक्रमित होण्याचा प्रश्नच उद्भवत होता व नाही याउपर मुळातच ८१ गुंठे इतके क्षेत्र धारण करत असताना ५६ गुंठे इतके क्षेत्र कुणाचे व कशाप्रकारे निघाले हाच मोठा प्रश्न आहे. तसेच सदरचे नकाशे पाहिले असता अतिक्रमण म्हणून दाखवलेले क्षेत्र हे पश्चिम बाजूला निघत असून घोरपडे यांचे क्षेत्र दक्षिण दिशेला आग्नेय कोपऱ्यात आहे. याचमुळे मुश्रीफ यांनी त्यांच्या पदाचा महानगरपालिकेतील सत्तेचा गैरवापर करत कश्याप्रकारे महानगरपालिकेच्या मालकीची कोट्यावधी रुपयांची जमीन बळकावली तसेच ओपन स्पेसमध्ये कोट्यावधी रुपयांची इमारत बांधली असा आमचा थेट आरोप आहे. याव्यतिरिक्त रि. स.नं. ८७३ मधील ३५ गुंठे क्षेत्र हे रि.स.नं. ८७४ मध्ये अतिक्रमित आहे असे देखील दाखवून ते देखील बोगस मालक उभा करून बळकावण्याच्या प्रयत्नात आहेत असे समजून आले आहे.या सर्व प्रकरणात रि.स.नं. ८७४ या मिळकतीमध्ये ड्रिम वर्ल्ड वॉटर पार्क या नावाने ज्ञानशांती कंपनी हि भाडे तत्वाने व्यवसाय करत होती. या कंपनीचे संचालक भागीदार मा. नाम. सतेज उर्फ बंटी डी. पाटील व यांचे कुटुंबीय होते. पण त्यांच्यापैकी कोणीही सामाजिक जान व भान ठेवत, कोल्हापूरचे एक सुजान नागरिक म्हणून देखील त्यांच्या ताब्यातील मिळकत हि बळकावली जात असताना साधी तक्रार हरकत देखील केलेली दिसून येत नाही उलटपक्षी मूक समर्थन देऊन सहकार्यच केले. आणि म्हणूनच आम्ही असे म्हणतो कि, कोल्हापुरातील मुश्रीफांच्या आदर्शला सतेज किनार.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.