यंत्राद्वारे भात लागवडीचे प्रात्यक्षिक सादरीकरण

१ऑगस्ट ते १५ ऑगस्ट महसूल पंधरवाडा आयोजित कृषी मार्गदर्शन कार्यक्रम

रत्नागिरी : सचिन पाटोळे 

दि .६  :महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत.दि १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान महसूल पंधरवाडा  कृषी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे . ५/८/२०२४  रोजी मौजे सरंद, ता.संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे तहसीलदार श्रीमती अमृता साबळे  व  तालुका कृषी अधिकारी श्री विनोदजी हेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत यंत्राद्वारे भात लागवडीचे प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले.

सकाळच्या  सत्रात श्री शंतनू बापट यांच्या प्रक्षेत्रावर यंत्राद्वारे भात लागवड लावणी प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी श्री विनोदजी हेगडे  यांनी यंत्राद्वारे भात लागवडीचे महत्त्व व काळाची गरज याविषयी मार्गदर्शन केले, सदर प्रात्यक्षिकाला माननीय तहसीलदार श्रीमती अमृता साबळे, मंडळ कृषी अधिकारी श्री प्रभाकर कांबळे, मंडळ आधिकारी श्री मंडले ,कृषी सहाय्यक श्री भानुदास दौंड, सरपंच श्रीमती सोनाली जाधव, उपसरपंच श्री उमेश पवार, पोलीस पाटील श्री नंदन भागवत, तलाठी श्री सुरेश जाधव, श्री आंग्रे, श्री दिगंबर चौधर, ग्रामसेवक श्री कांबळे, प्रगतशील शेतकरी श्री संतोष बाळाराम गोटेकर, शक्तिमान कंपनीचे मॅनेजर श्री यश नामदास ऑपरेटर श्री सूरज, ऑपरेटर श्री अमित मलाप व ५० शेतकरी उपस्थित होते. तसेच दुपार सत्रात महसूल पंधरवडा अंतर्गत कृषी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाची सुरुवात प्रस्तावना श्री एम आर कांबळे यांनी केली. तसेच पुढे भात लागवडीच्या पद्धती विषयी श्री प्रभाकर कांबळे मंडळ कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महाडीबीटी, PMFME, डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना इत्यादी योजना विषयी माननीय तालुका कृषी अधिकारी श्री विनोदजी हेगडे साहेब यांनी मार्गदर्शन केले.
महसूल पंधरवडा अंतर्गत विविध योजनांचे मार्गदर्शन माननीय तहसीलदार मॅडम श्रीमती अमृता साबळे  यांनी मार्गदर्शन केले. शक्तिमान कंपनीचे मॅनेजर श्री यश नामदास यांनी भात लागवडीच्या यंत्राविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास सरपंच श्रीमती सोनाली जाधव, उपसरपंच श्री उमेश पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री दीपकजी जाधव, मंडळ आधिकारी श्री मंडले ,कृषी सहाय्यक श्री भानुदास दौंड, तलाठी श्री सुरेश जाधव, श्री आंग्रे, श्री दिगंबर चौधर, ग्रामसेवक श्री एम आर कांबळे, पोलीस पाटील श्री नंदन भागवत, प्रगतशील शेतकरी श्री संतोष बाळाराम गोटेकर, श्री शंतन बापट, तंटामुक्ती अध्यक्ष श्री विश्वास पवार, श्री संदीप पवार, गावकर श्री अनंत गोटेकर आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.