शाहु साखर कारखानाच्या वतीने मॅटवरील कुस्ती स्पर्धाचे आयोजन

दुसऱ्या दिवशी कुमार गटात २०० मल्लांनी केली नोंदणी

 

 

कागल : प्रतिनिधी

येथील शाहू साखर कारखान्याच्या मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धेत आज मंगळवारी ता 5 रोजी दुसऱ्या कुमार गटात दोनशे मल्लांची नोंदणी झाली. उद्या बुधवारी ता.६ रोजी ज्युनियर, सीनियर व महिला गटातील लढती होतील. त्यानंतर सायंकाळी कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरणाचा समारंभ होणार आहे.

खुल्या गटामध्ये दोन प्रदर्शनीय कुस्त्या होणार आहेत. त्यामध्ये पुरुष गटामध्ये राष्ट्रीय चॅम्पियन आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुण्याचा गणेश जगताप विरुद्ध बाल पंजाब केसरी विजेता पंजाबचा जसपुर्ण यांच्यात लढत होणार आहे .तर महिला गटात शाहू साखर कारखान्याची मानधनधारक राष्ट्रीय चॅम्पियन सृष्टी भोसले विरुद्ध अहमदनगरची राष्ट्रीय चॅम्पियन पल्लवी खेडकर यांच्या मध्ये होणार आहे.

काल सुरू झालेल्या बाल गटातील अंतिम फेरीतील लढती आज पूर्ण झाल्या.त्यांचे बक्षीस वितरणही करण्यात आले. आज कुमार गटातही प्रेक्षणीय कुस्त्या झाल्या. या सर्व कुस्त्यांचे सोशल मीडियावर थेट प्रसारण करण्यात आले होते. तसेच कुस्ती कार्यस्थळाच्या बाजूला स्क्रीनवर सुद्धा इतर कुस्ती प्रेमींसाठी कुस्त्या पाहण्याची सोय करण्यात आली आहे.

स्पेर्धेचे पंच म्हणून संभाजी पाटील, संभाजी वरुटे, बटू जाधव, प्रकाश खोत, बापू लोखंडे, बाळासो मेटकर, नामदेव बल्लाळ, अमर पाटील, रामा माने,रवींद्र पाटील, कृष्णात पाटील, सुरेश लंबे ,दत्तात्रय एकशिंगे विलास टिपुगडे यांनी काम पाहिले. तर कृष्णा चौगुले व राजाराम चौगुले हे निवेदक म्हणून काम करीत आहेत.

बाल गटातील वजनवाईज विजेत्या मल्लांची अनुक्रमे नावे अशीः
२४किलो :साईराज बोराटे (व्हन्नूर), शिवरुद्र चौगुले( एकोंडी), सत्यजित निचीते (व्हनाळी), प्रद्युम्न हिरूगडे( बानगे ),
२६किलो :शुभम जठार (बानगे), आदित्य पाटील (बेलवळे), ओंकार काशीद (दिंडनेर्ली), पृथ्वीराज मोहिते (कोगील).
२८ किलो: गौरव पाटील (नंदगाव ),स्वराज्य कदम (पाचगाव ),संदेश गुजर( मुरगूड), रितेश मगदूम (बानगे).
३० किलो: शिवानंद मगदूम (सिद्धनेर्ली ), पृथ्वीराज शिनगारे (तळंदगे), हर्षवर्धन वरुटे (कागल), हर्षवर्धन एकशिंगे (केनवडे),
३२किलो- हर्षवर्धन माळी (शाहू साखर ),ओंकार जाधव (पिंपळगाव खुर्द), ओम पाटील (दिंडनेर्ली ),श्रेयस बोडके (द. वडगाव)
३५ किलो :प्रथमेश पाटील (बानगे), धनराज जमनिक(बानगे) पृथ्वीराज मगदूम ( सिद्धनेर्ली ), श्रीधर मगदूम (सौंदलगा ),
३८ किलो-: विनायक तांबेकर( सोनगे), हर्षवर्धन पाटील (बानगे )श्रीवर्धन टिपुगडे( कळंबा), सतेज दळवी (इस्पुर्ली )
४१किलो :गणेश तेरसे(पाचगाव) सचिन पाटील (केंबळी) ओम मेटील(दिंडनेर्ली) साईराज वाडकर (मुरगुड)

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.