स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे यांचा सन्मान

 

संगमेश्वर:

गेली अनेक वर्षे पोलीस सेवेत नोकरी बजावत असताना प्रामाणिकपणे गुन्हे तपास,योग्य निवाडा,असंख्य भांडण तंटे मिटवणे, सायबर गुन्ह्यांपासून सावध राहणेकरीता विविध कार्यक्रमातून मार्गदर्शन करणे,तसेच संगमेश्वर पोलीस स्टेशनवर अवलंबून असणाऱ्या तमाम जनता बांधवांशी सलोख्याचे संबंध निर्माण करणे व त्यामुळे प्रामाणिकपणे कामगिरीचा उत्तम ठसा उमटवून उत्कृष्ट केलेल्या कामगिरीबद्दल गेल्या दोन वर्षांपूर्वी संगमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे यांना महासंचालक पदक प्राप्त झाले आहे.

‌‌‌‌‌ यानिमित्ताने त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप द्यावी व येथोचित सन्मान करावा व पुढे सुद्धा त्यांना नवीन उमेद मिळून व अशीच जनसेवा चालू ठेवावी व सामान्य जनतेला सुरक्षिततेसाठी एक आधार द्यावा या हेतूने ज्येष्ठ नागरिक संगमेश्वर यांच्या वतीने त्यांच्या कार्याचे वर्णन करणारे काव्यरूपी सन्मान पत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी समाजसेवक प्रकाश उर्फ दादा कोळवणकर,प्रमोद शेट्ये,उदय संसारे,दिनेश व व्यवसाईक खातू इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.