किसनराव आवळे बाल मंदिर प्राथमिक विद्यामंदिर व माध्यमिक विद्यालय कोरोची मध्ये राष्ट्रीय ध्वजारोहण संपन्न

कोरोची :सलीम माणगावे 

दि .१६ : किसनराव आवळे बाल मंदिर प्राथमिक विद्यामंदिर व माध्यमिक विद्यालय कोरोची मध्ये राष्ट्रीय ध्वजारोहण मोठ्या उत्साहात साजरा झाला. शाहू शिक्षण संस्था संचलित किसनराव आवळे शैक्षणिक संकुलामध्ये मानसोपचार तज्ञ डॉ.सिमोन आवळे यांच्या हस्ते ध्वजपूजन व रोटरी क्लबचे अध्यक्ष अँड.विश्वासराव चेनगुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी मान्यवरांना विद्यालयाच्या एम.सी.सी. छात्रसैनिकांनी मानवंदना दिली

.त्यानंतर मुख्याध्यापक के. डी .चौगुले सर त्यांच्या हस्ते सर्व पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ शिक्षक श्री .एम .जे. मुजावर सर यांनी केला.यावेळी महालक्ष्मी  टाइम्सचे पत्रकार सलीम माणगावे  हे उपस्थित होते.तसेच याप्रसंगी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी मराठी आणि इंग्रजीतून १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनी निम्मित भाषने  केली. पाहुण्यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी देशभक्तीपर नृत्य साजरी करण्यात आली. विविध उपक्रमांनी हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केदार सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गायकवाड सर ,सावंत सर ,कोळी सर ,सातवेकर मॅडम ,जाधव मॅडम तसेच प्राथमिक च्या मुख्याध्यापिका कांबळे मॅडम व सर्व स्टाफ उपस्थित होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.