इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील रस्ते कामासाठी नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या वतीने १.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर

माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश

इचलकरंजी विजय मकोटे 
दि .२३:आमदार प्रकाश आवाडे यांच्या पाठपुराव्यातून इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील रस्ते कामासाठी नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या वतीने १.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची कामे मार्गी लागणार आहेत. राज्यातील महानगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत यांना सन २०२२ -२३- व २०२३-२०२४ साठी विशेष रस्ता अनुदान लेखाशीर्ष (३०५४००२२) या योजनेंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
महापूर व पावसामुळे इचलकरंजी शहरातील रस्त्यांची अत्यंत दूरवस्था झाली आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी  १  कोटी ५० लाख रुपयांचा निधी विशेष रस्ता अनुदान अंतर्गत इचलकरंजीसाठी मिळावा म्हणून आमदार आवाडे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. लवकरच गणेशोत्सव सुरु होत असून तत्पूर्वी हा निधी मिळावा अशी मागणी आमदार आवाडे यांची होती. त्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनीही प्रयत्न सुरु ठेवले होते. या प्रयत्नांना यश आले आहे.
नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या वतीने रस्ते कामासाठी १.५०  कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने लवकरच रस्त्यांची दूरवस्था दूर होऊन कायापालट होणार आहे. ही कामे गणेशोत्सवापूर्वी व्हावीत यासाठी प्रयत्नशील असून निवडणूकीत दिलेल्या विकासकामांची वचनपूर्ती या निमित्ताने होत आहे. या कामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.