संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये उद्योग सुरक्षा आणि आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
कोल्हापूर:संतोष कांबळे
दि..२५:संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट-टर्म कोर्सेस अंतर्गत “ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी” या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी उद्योग सुरक्षा आणि आरोग्य या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक देविदास गोरे, संचालक, ग्लोबल कम्युनिटी केअर इन्स्पायर सेफ्टी फाउंडेशन, मुंबई हे होते.

कार्यक्रमाला संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट-टर्म कोर्सेसचे विभाग प्रमुख प्रा. अजय बी. कोंगे, कॉम्प्युटर विभाग प्रमुख प्रा. सागर चव्हाण, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन विभाग प्रमुख प्राध्यापिका रईसा मुल्ला, इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्रा. नितीन पाटील, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. योगेश पोवार, तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. विराट गिरी यांनी उद्योग सुरक्षा आणि आरोग्य या विषयाचे महत्त्व स्पष्ट केले आणि प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. प्रमुख मार्गदर्शक देविदास गोरे यांनी उद्योग सुरक्षा उपाय, आरोग्य मानके, सुरक्षित कार्य पद्धती व नियमावली यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच, इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत असताना सुरक्षिततेच्या उपाययोजना कशा अवलंबाव्यात, याविषयी विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली.
विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे यांनी संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये चालू असलेल्या “ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी” या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त कोर्सची माहिती दिली. त्यांनी प्रवेश प्रक्रिया, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रमाचे नियोजन आणि कोर्सची उपयुक्तता यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणित भोसले यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. अजय कोंगे यांनी मानले. संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजयजी घोडावत आणि विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
—
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.