डीकेटीईत ‘फॅशन फ्यूजन’ फॅशन शो उत्साहात संपन्न
इचलकरंजी:विजय मकोटे
दि २५ फेब्रुवारी: डीकेटीई इन्स्टिट्यूटमध्ये पार पडलेल्या ‘फॅशन फ्यूजन’ फॅशन शोने विद्यार्थ्यांच्या कल्पक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. डीकेटीईमध्ये दरवर्षी आयोजित होणारा हा फॅशन शो विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संकल्पना साकारत ट्रॅडीशनल, फॉर्मल आणि कॅज्युअल अशा विविध प्रकारांमध्ये फॅशनचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

आकर्षक संगीत आणि प्रकाशझोताच्या तालावर विद्यार्थ्यांनी विविध थीम सादर केल्या. स्टाईल सेन्सेशन आणि इक्लिप्स या दोन संघांनी सहभाग घेतला. स्टाईल सेन्सेशन ग्रुपने पारंपरिक पोशाख परिधान करून भारतीय संस्कृतीचे मोहक सादरीकरण केले. तर इक्लिप्स ग्रुपने गॉथिक थीमवर आधारित अनोखे आणि नाट्यमय सादरीकरण करून प्रेक्षकांना भारावून टाकले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व ट्रस्टींचे मार्गदर्शन लाभले. उद्घाटन संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. एल. एस. अडमुठे, डेप्युटी डायरेक्टर डॉ. यु. जे. पाटील, सोशल डीन प्रा. एस. जी. कानिटकर, सोशल प्रमुख प्रा. ए. व्ही. शहा, डॉ. ए. आर. बलवान व प्रा. ए. यु. अवसरे यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. व्ही. के. ढंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट संयोजन केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना फॅशन डिझाइनिंग आणि सादरीकरणाची व्यावहारिक संधी उपलब्ध झाली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.