शिक्षण समाजासाठी आहे -डॉ. मोलूग्राम: डॉ.मगदूम अभियांत्रिकी मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

जयसिंगपूर: राम आवळे 

दि.२४ : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, एम. टेक. तसेच एम. सी. ए. मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व पालक यांचा स्वागत व सत्कार समारंभ संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात ट्रस्टचे दिवंगत चेअरमन कै.डॉ.जे. जे.मगदूम व कै. प्रभा जे. मगदूम यांच्या प्रतिमेस वंदन करून करण्यात आली. ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व उपस्थित मान्यवरांच्या सोबत आपले असणारे ऋणानुबंध विशद केले.सुरवातीस उस्मानीया, हैद्राबाद उद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कुमार मोलूग्राम यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी श्री. अनिकेत दुडेजा (संचालक,नॅशनल वॉटर अकॅडमि),डॉ. संतोष भावे (मा.संचालक,भारत फोर्ज), गणेश दोड्डी (ब्रेनोव्हिजन सोलुशन इंडिया.प्रा.लि.)श्री.देवदत् कल्याणकर,श्री.एस.के.हिरेमठ,मा.राजश्री मगदूम (ट्रस्टी डॉ.जे.जे.मगदूम ट्रस्ट),कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे उपस्थित होते.
महाविद्यालयानेअनेक नामांकित राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपनीची सामंजस्य करार केला आहे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल असे प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील म्हणाल्या.ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम व कु.राजश्री मगदूम (ट्रस्टी) यांनी प्रवेश प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भारत फोर्ज कंपनी स्टीलला आकार देण्याचे काम करते विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान शिकून भविष्याला आकार द्यावा असे डॉ.भावे म्हणाले. विद्यार्थ्यांनी इन्हान्स लर्निंगचा वापर करावा, ए. आय. प्रगत तंत्रज्ञानाचे मॉडेल आहे पण ते माणसाची जागा घेऊ शकत नाही असे श्री. अनिकेत दुडेजा यांनी सांगितले. इंजिनीअर्स म्हणजे प्रॉब्लेम सोल्वर अशी व्याख्या सिद्ध करा असे डॉ. गणेश नाग दोड्डी यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सांस्कृतिक विभागाकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी,नवप्रवेशित विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डीन सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाने विशेष परिश्रम घेतले आभार विभाग प्रमुख डॉ. एम. बी. भिलवडे यांनी मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.