श्रद्धा इन्स्टिट्यूशन्स”च्या यशस्वी प्रवासाला सलाम! – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कबनूर:हबिब  शेखदर्जी 

दि. २३: इचलकरंजी ही प्रशासकीदर्यजी अधिकारी घडवणारे शहर व्हावे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी केले. श्रद्धा इन्स्टिट्यूशन्सचे संस्थापक अध्यक्ष ए. आर. तांबे यांच्या एकसष्ठीनिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते.

ते म्हणाले की, श्रद्धा इन्स्टिट्यूशन्सच्या अद्ययावत व गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी इचलकरंजीत शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. हे श्री. ए. आर. तांबे यांचे मोठे यश असून, ते जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. डॉक्टर व इंजिनियर मोठ्या प्रमाणात निर्माण केल्यानंतर आता प्रशासकीय अधिकारी घडवण्याची जबाबदारी तांबे सरांवर आहे, असेही त्यांनी नमूद केले.

अभिषेक तांबे यांनी स्वागत व प्रास्ताविकात श्रद्धा क्लासेस ते श्रद्धा इन्स्टिट्यूशन्स या संस्थेच्या प्रेरणादायी वाटचालीचा आढावा घेतला. पीपीटीच्या माध्यमातून तांबे सरांचा जीवनपट सादर करण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते ए. आर. तांबे व त्यांच्या धर्मपत्नी राजश्री तांबे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ‘शैक्षणिक मुद्रा’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

माजी खासदार संजयकाका पाटील यांनी तांबे सरांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी भान ठेवून शैक्षणिक योजना आखल्या आणि बेभान होऊन त्या राबवल्या. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवले आहे. माजी आमदार सुरेशराव हळवणकर, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार राजूबाबा आवळे यांनीही तांबे सरांच्या कार्याचा गौरव केला.

या कार्यक्रमाला शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख रवींद्र माने, अशोक स्वामी, सपना आवाडे, प्रकाश दत्तवाडे, डी. एम. कस्तुरे, जयकुमार कोले, अमृत भोसले, माजी शिक्षणाधिकारी बी. बी. भंडारे, विजय राजापुरे, श्रीकांत तांबे, अक्षय तांबे, निवास फराकटे, रवी अचलकर, सचिन कलश, एच. ए. पाटील, सुप्रिया कौंदाडे, संगीता पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

संतोष आभाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर संजय कोले यांनी आभार मानले. सकाळचे सरव्यवस्थापक (दक्षिण महाराष्ट्र) यतीश शहा, उपसरव्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके आदीसह अनेक मान्यवरांनी तांबे सरांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.