घोडावत ऑलिम्पियाडची श्रद्धा गणे दहावीत सांगली जिल्ह्यात प्रथम

अतिग्रे:सलीम मुल्ला 

दि २३ : संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलने दहावी परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे . संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलची विद्यार्थीनी कु. श्रद्धा श्रीयांश गणे हिने 100 % गुण प्राप्त करून सांगली जिल्हयात प्रथम येण्याचा मान पटकवला.

ऑलिम्पियाड स्कूलच्या सांगली, इचलकरंजी, अंकली शाखेतील ५ विद्यार्थ्यांनी ९८ % , ४४ विद्यार्थ्यांनी ९५% , १२१ विद्यार्थ्यांनी ९०% , २२६ विद्यार्थ्यांनी ८०% , ३०२ विद्यार्थ्यांनी ७०% , ३१९ विद्यार्थ्यांनी ६० % गुण प्राप्त करून स्कूलचे नाव उज्वल केले आहे. स्कूलने १००% यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली .सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, डायरेक्टर वासू कोंडूती, झोनल हेड प्रभु श्रीनिवास यांनी अभिनंदन केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.