मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आयुष्यमान भारत कार्डांचे वितरण
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि .७ : मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून, इचलकरंजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व कुटुंबांना आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.या उपक्रमाअंतर्गत आज सोमवार, दि. ७ जुलै रोजी नागरी आरोग्य केंद्र, तांबे माळ येथे आयुष्यमान भारत कार्डांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक मा. पल्लवी पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कार्डांचे वाटप करण्यात आले.

यावेळी सहा. आयुक्त विद्या कदम, सहा. आयुक्त रोशनी गोडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश चव्हाण, डॉ. कश्मीरा बडबडे, डॉ. प्राची ढाले, क्रीडा अधिकारी संजय शेटे, उपलेखापाल रामचंद्र कांबळे, कर अधीक्षक दिपक खोत, रेकॉर्ड कीपर सदाशिव गोनुगडे तसेच तांबे नागरी आरोग्य केंद्रातील परिचारिका, कर्मचारी व आशा वर्कर्स उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या माध्यमातून परिसरातील लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळावा, हा उद्देश ठेवण्यात आला आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.