इचलकरंजीत जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार!

जनसुरक्षा कायदा म्हणजे लोकशाहीवर आक्रमण – शशांक बावचकर यांचा आरोप

इचलकरंजी: विजय मकोटे

दि .१८ :महाराष्ट्र सरकारने नुकताच मंजूर केलेल्या जनसुरक्षा कायदा 2024 च्या विरोधात आज इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी या वादग्रस्त कायद्याची होळी करून काँग्रेसने आपला निषेध नोंदवला.या निदर्शनावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “जनसुरक्षा कायदा हा लोकशाहीवर केलेला थेट आघात आहे. नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणणारा आणि राजकीय विरोधकांना दबावाखाली ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. हा कायदा मागे घेण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल.”

कार्यक्रमाचे आयोजन शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झाले होते. त्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना सरकारच्या हुकूमशाही वृत्तीवर टीका केली.या निदर्शनात पुढील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते:
शशांक बावचकर, संजय कांबळे, बाबासाहेब कोतवाल, शशिकांत देसाई, प्रमोद खुडे, युवराज शिंगाडे, अजित मिणेकर, रवींद्र पाटील, प्रशांत लोले, ताहीर खलिफा, योगेश कांबळे, अण्णा कांबळे, तौसिफ लाटकर, रवी वासुदेव, सुदाम साळुंखे, प्रमोद नेजे, ओंकार आवळकर, दशरथ जावळे, राजु किणेकर, प्रवीण फगरे, शिवाजी चव्हाण, बिस्मिल्ला गैबान, वेदिका कळंत्रे, चंद्रकांत लोकरे, हिदायत आत्तार, रोहित जावळे, राजु ब्बनावर, रवी नवाळे आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.