‘अल्ट्राटेक शुभारंभ’ कार्यक्रम उत्साहात संपन्न – घरबांधणीसाठी एकाच छताखाली मार्गदर्शन
इचलकरंजी :विजय धुत्रे
दि. २० जुलै –महेश भवन, इचलकरंजी येथे अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अल्ट्राटेक शुभारंभ’ या एकदिवसीय ग्राहक अभिमुख कार्यक्रमाचा शुभारंभ माजी वस्त्रोद्योग मंत्री श्री. प्रकाशअण्णा आवाडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाला अल्ट्राटेक सिमेंटचे रिजनल हेड (टेक्निकल) इंजी. शितलराज सिंदखेडे, टेरिटरी सेल्स हेड कोल्हापूर श्री. अविनाश जेऊरकर,व श्री. जयवंत लोखंडे, चॅनेल रिलेशनशिप मॅनेजर श्री. कल्पक मेहता तसेच इंजी. राजेंद्र खंडेराजुरी (व्हॉइस प्रेसिडेंट, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया – इचलकरंजी सेंटर), इंजी. शितल काजवे (वाईस प्रेसिडेंट, क्रेडाई इचलकरंजी), श्री. तानाजी हराळे आणि अल्ट्राटेक सिमेंटचे प्रमुख डीलर्स श्री. नितीन धूत, श्री. घनश्याम सावलानी, श्री. सुरेश चौगुले, श्री. अशोक गुंडे, श्री. करण मनवानी यांची उपस्थिती लाभली.

‘अल्ट्राटेक शुभारंभ’ हा कार्यक्रम गृह बांधणीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त ठरला. आधुनिक बांधकाम साहित्य, पर्यावरणपूरक गृह संकल्पना, आदर्श बांधकाम पद्धती, तसेच घर बांधणीसंबंधी सर्वसामान्य नागरिकांच्या शंका व अडचणींचे निरसन या सर्व गोष्टी एकाच छताखाली करण्यात आल्या.प्रमुख पाहुणे श्री. प्रकाश आवाडे यांनी आपल्या भाषणात अल्ट्राटेक सिमेंटच्या विश्वासार्हतेचा, गुणवत्तेचा व अत्याधुनिक उत्पादनांचा विशेष उल्लेख करत, इचलकरंजी शहराच्या बांधकाम क्षेत्रात अल्ट्राटेक सिमेंटचा महत्त्वपूर्ण वाटा राहील, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात पंचक्रोशीतील अनेक गृह निर्माता, इंजिनिअर्स, आर्किटेक्ट्स, बिल्डर्स, वितरक, व्यापारी आणि उद्योजक यांनी सहभाग नोंदवला. सुमारे १००० हून अधिक लोकांनी दिवसभरात या कार्यक्रमाला भेट देत घर बांधणीसाठी आवश्यक उत्पादन व सेवेबाबत सखोल माहिती मिळवली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अल्ट्राटेक सिमेंटचे डीलर्स श्री. हर्षल धूत, श्री. रोहित सावलानी, श्री. सुजित चौगुले, श्री. अनुप गुंडे, श्री. बंडोपंत विभूते, श्री. करण मनवानी, श्री. नितीन शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली.’अल्ट्राटेक शुभारंभ’ कार्यक्रमाने इचलकरंजी परिसरातील बांधकाम व्यावसायिक व गृहस्वामींसाठी मूल्यवर्धन करणारा मंच उभा केला असल्याचे प्रतिपादन अनेक सहभागी ग्राहकांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.