डॉ. पूजा अनिल बागणे यांना ‘सिम्बायोसिस हॉल ऑफ’ फेम पुरस्कार

जयसिंगपूर: राम आवळे 

दि .२९; जयसिंगपूर येथील डॉ. पूजा अनिल बागणे यांना सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) ने त्यांच्या प्रतिष्ठित ‘हॉल ऑफ फेम पुरस्कार २०२५’ या अध्यापन विभागातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. कुलपती डॉ. एस.बी. मुजुमदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संजिवणी मुजुमदार, कुलगुरु डॉ विद्या येरवडेकर, डॉ. राजीव येरवडेकर, कुलगुरु डॉ. रामकृष्ण रामन, डायरेक्टर डॉ. केतन कोटेचा उपस्थीत होते. हा सन्मान पुणे येथील सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये झाला.

           डॉ. बागणे यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले सातत्यपूर्ण योगदान, विद्यार्थ्यांशी प्रभावी संवाद, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि शैक्षणिक नेतृत्व, समर्पणवृत्ती यामुळे त्या या पुरस्कारासाठी निवडल्या गेल्या. या पुरस्कारामुळे त्यांच्या उत्कृष्ट कार्याची व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी घेतलेल्या मेहनतीची प्रशंसा करण्यात आली आहे.

            सिम्बायोसिस विद्यापीठातर्फे दिला जाणारा हा पुरस्कार गुणवत्तापूर्ण शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करतो. हा पुरस्कार विद्यापीठातील पदाधिकारी, प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

            डॉ. बागणे यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या पदविका व पदवी, त्यानंतर पदव्यत्तर शिक्षणात गोल्डमेडल मिळविले आहे. त्यानंतर त्यांनी पी.एचडी. केले आहे. अलीकडेच त्यांना रशियन फेडरेशनद्वारे प्रायोजित रशियातील नोवोसिबिर्स्क स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये इंटरशिया फेलोशिप मिळाली असून त्यांनी ती पूर्ण केली आहे. सध्या त्या सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये अध्यापनाचे काम करतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.