रुकडीतील कडकडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; माधुरी हत्ती प्रकरणावरून शासनाच्या धोरणाचा निषेध

रुकडी :ता. (हातकणंगले) –सलीम मुल्ला
       दि. २ .ऑगस्ट २५ :नांदणी येथील माधुरी हत्तीला शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गुजरातमध्ये हलवण्यात आल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांप्रमाणे रुकडी गावातही आज (शनिवार) कडकडीत बंद पाळण्यात आला. रुकडी व्यापारी असोसिएशनने या बंदचा निर्णय घेतला असून, संपूर्ण गावाने या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.गावातील सर्वच दुकाने, व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. व्यापारी, दुकानदार, तसेच ग्रामस्थांनी शासनाच्या निर्णयाचा निषेध करत माधुरी हत्तीला नांदणी येथेच परत आणण्याची जोरदार मागणी केली.

या वेळी सरपंच राजश्री रुकडीकर, उपसरपंच मालती इंगळे, ज्येष्ठ नेते रमेश कांबळे, दिलीप इंगळे, अभिनंदन खोत, शीतल खोत, रोहन देसाई, संतोष कांबळे, तसेच जैन समाजातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी शासनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत हत्तीला परत आणण्याची मागणी केली.ग्रामस्थांनी व्यापाऱ्यांनी घेतलेल्या बंदाच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांचे आभार मानले. या बंदामुळे रुकडी गावात शांततेत परंतु ठामपणे शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवण्यात आला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.