गुंजते स्वर – रफी से किशोर स्वर्गीय मोहम्मद रफी व किशोर कुमार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भावस्पर्शी गीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

महालक्ष्मी टाइम्स व रोटरी क्लब इचलकरंजी यांचा संयुक्त उपक्रम

इचलकरंजी: विजय मकोटे 

(दि. ५ ऑगस्ट) :स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी (३१ जुलै) आणि स्वर्गीय किशोर कुमार यांच्या जयंती (४ ऑगस्ट) या औचित्याने महालक्ष्मी टाइम्स आणि रोटरी क्लब इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानाने “गुंजते स्वर – रफी से किशोर” या कराओके गीतांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.हा कार्यक्रम इचलकरंजी येथील रोटरी क्लबच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस रफी आणि किशोर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. महालक्ष्मी ग्रुप मीडियाचे संस्थापक व संपादक श्री. फिरोज शेख यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमामागील प्रेरणा स्पष्ट केली.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब इचलकरंजीचे अध्यक्ष श्री. संजय घायतिडक, उपाध्यक्ष पंकज कोठारी, माजी अध्यक्ष अजित कुरडे सेक्रेटरी श्री. राजू पाटील, सेक्रेटरी साईप्रसाद ग्रुपचे प्रमुख व माजी उपनगराध्यक्ष श्री. सुनील महाजन, यशवंत प्रोसेसचे चेअरमन श्री. अहमदभाई मुजावर, रोटरी चे शितल चौगले,बहुजन सामाजिक संघटनेचे अध्यक्ष श्री. आयुब बागवान, उपाध्यक्ष निवास गावडे, महिला अध्यक्षा सौ. शोभा वसवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात डॉ. कुमार कराळे, विजय शिंदे, शौकत बागवान, सलीम मुल्ला, समीर चौगुले, शिवाजी पाटील, कुलदीप कांबळे, शितल मांजरे, कुमारी कांचनमाला भाट, शोभा बावधनकर, सौ. स्मिता पाटील, श्रीमती शुभांगी कुलकर्णी, सौ. वंदना बाळकाई, सौ. गीतांजली कबाडे, सौ. रेणू पोवार यांनी अजरामर हिंदी गीतांची बहारदार मैफल सादर केली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. कुमार कराळे, विजय शिंदे, शौकत बागवान, आणि कांचनमाला भाट यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. समीर चौगुले यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय शिंदे यांनी केले.भावना, स्वर आणि आठवणींनी भरलेला हा संगीतमय कार्यक्रम रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत संस्मरणीय ठरला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.