भगवान बुद्ध सलोखा मंडळ, कुचांबे-मुंबई तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न
संगमेश्वर: सचिन पाटोळे
दि .१९: संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे बौद्धवाडीत भगवान बुद्ध सलोखा मंडळ, कुचांबे-मुंबई यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्षपद सुनिल देवराम कदम यांनी भूषविले. जि.प. माजी अध्यक्ष श्री. संतोष थेराडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चिटणीस सुरेंद्र सुरेश कदम, सभासद व महिला मंडळ सदस्यांसह मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला.

या प्रसंगी मान्यवर म्हणून ग्रामपंचायत सरपंच सौ. वंदना थेराडे, उपसरपंच धर्मचंद्र कदम, सदस्या प्रणाली कदम, मा. सैनिक दत्ताराम सुर्वे, पोलिस पाटील सुदर्शन कदम, तंटामुक्ती अध्यक्ष उदय थेराडे, ग्राम रोजगार सहाय्यक शाम काजवे, प्रा. जि.प. केंद्रशाळा कुचांबेचे मुख्याध्यापक बाबासाहेब पवार, शिक्षक गायकवाड सर, कवायत सर, चव्हाण सर, उद्योजक प्रकाश टाकळे, इंजि. दीपक झगडे, इंजि. सुभम थेराडे, इंजि. ओमकर सुर्वे, आशा सेविका वृशाली सुर्वे, स्थानिक मंडळ अध्यक्ष अशोक वि. कदम उपस्थित होते

.गावातील नागरिक, कार्यकर्ते व महिला मंडळ सदस्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.