मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘निर्भय पथक’ मार्गदर्शन कार्यक्रम
इचलकरंजी : हबीब शेख दर्जी
दि .२६ :श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित , मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी मध्ये आज निर्भयापथक इचलकरंजी विभाग विद्यार्थी समूपदेषण चा कार्यकम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी पोलीस कॉन्स्टेबल मगदूम सर आणि चौगुले मँडम तसेच पोलीस हवालदार वेदिका पाटील मँडम , पुजारी मँडम आणि शिराजभाई सर हे उपस्थित होते.यांनी निर्भयापथक कामकाज, महिला व मुली सुरक्षा , आमली पदार्थ सेवन दुष्परिणाम, POCSO,NDPS, कायदा या सर्वाबद्दल विध्यार्थाना माहिती दिली.या कार्यकामासाठी संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.सुभाष केटकाळे सर,समन्वयक वसगडे सर, कॉलेजचे प्राचार्या सौ.मंगसुळे मँडम तसेच कॉलेज चे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यकामाची प्रस्तावना सौ. चौगुले मँडम आणि आभार सौ. नराटे मँडम यांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.