डॉ.आप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेची शेड्युल बँकेकडे सभासदांच्या पाठबळावर वाटचाल…….
जयसिंगपूर : राम आवळे ‘
दि .२६ ; डॉ.आप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक २५.०८.२०२५ रोजी दुपारी ठीक ०१.०० वाजता दि.मर्चंट असोसिएशन हॉल ९ वी गल्ली,जयसिंगपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
प्रथमता बँकेचे बँकेचे संस्थापक स्वर्गीय माजी आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील साहेब यांचे फोटो पूजन करण्यात आले. तदनंतर बँकेचे चेअरमन श्री सुरेश भुपाल पाटील यांनी सर्व उपस्थित सभासद व सर्व मान्यवरांचे स्वागत केले बँकेचे कार्यकारी संचालक श्री जनार्दन महादेव बोटे यांनी प्रथमता अहवाल सालात दिवंगत झालेले मान्यवरांची यादी वाचन करून त्यांना श्रद्धांजली वाहिली,त्यानंतर कार्यकारी संचालक यांनी बँकेचे विषयावर नोटीस वाचन केले त्यास सभासदांनी सर्व विषय समजून घेऊन एकमताने सर्व विषयास मंजुरी दिली.
आपल्या बँकेने सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात एकूण ७१३ कोटीचा व्यावसायिक टप्पा पार केला असून सध्या २० शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण १५ शाखा व कर्नाटक राज्यामध्ये एकूण ५ शाखांच्या माध्यमातून सभासदांना व ग्राहकांना सभासदांना व ग्राहकांना चांगली सेवा देत आहोत.वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर पोटनियम दुरुस्ती करणेबाबत मा.संचालक मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे शिफारस केलेल्या कार्यक्षेत्र वाढीबाबतच्या पोटनियमास दुरुस्ती प्रस्तावास सर्व सभासदानी एकमताने मंजुरी दिली त्याबद्दल बँकेचे कार्यकारी संचालक यांनी सर्व सभासदांचे आभार मानले.
बँकेला अहवाल सालात २ कोटी ३४ लाखाचा नफा झाला असून बँकेचे कार्यकारी संचालक यांनी सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात बँकेच्या सभासदांना 10% डिव्हीडंड शिफारस संचालक मंडळाने केलेले आहे त्याप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेने १०% डिव्हिडंट देत असल्याबद्दल बँकेचे सर्व सभासदांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले .बँकेचे तज्ञ संचालक श्री शंकर राऊ मांगलेकर यांनी बँकेच्या घोडदोडीचा आराखडा वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे सादर केला तसेच सध्या अस्तित्वात असलेली बँकिंग संकल्पना व भविष्यात येणारी बँकिंग मधील संकल्पना याबाबत सविस्तर माहिती बँकेच्या सभासद व उपस्थित सर्व मान्यवरांना दिली व बँकेचे भविष्यात असणारे शेड्यूल दर्जाचे उद्दिष्ट पूर्ततेसाठी बँक वाटचाल करीत असल्याचे वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे सांगितले तर नंतर बँकेच्या विविध मान्यवरांची व सभासदांची भाषणे झाली
सभेच्या शेवटी श्री.दत्त उद्योग समूहाचे मार्गदर्शक उद्यानपंडित सहकारमहर्षी माननीय श्री गणपतराव आप्पासाहेब पाटील (दादा) माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांनी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले यावेळी बँकेचे सर्व संचालक व विविध संस्थांचे पदाधिकारी चेअरमन,व्हा.चेअरमन लोकप्रतिनिधी पत्रकार मीडिया छायाचित्रकार उपस्थित होते इतर मनोगत मध्ये श्री अशोक कोळेकर,अँड.सर्जेराव घोरपडे श्री.दादासो पाटील,श्रीविश्राम कोळी,श्री हसन देसाई व आभार प्रदर्शन श्री शिवाजी शंकर पोळ यानी केले
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.