ब्रोज टी अँड कॉफी’चे इचलकरंजीत उत्साहात उद्घाटन
इचलकरंजी / हबीब शैख दर्जी
इचलकरंजी शहरात डॉ. लांडे हॉस्पिटलजवळ, एचडीएफसी बँकेसमोर, कोल्हापूर रोड येथे नव्या स्वरूपात सुरू झालेल्या ‘ब्रोज टी अँड कॉफी’ या उपक्रमाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शुभहस्ते रिबीन कट करून या खाद्य उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

शहरातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच नागरिकांना दर्जेदार व चविष्ट खाद्यपदार्थांची सुविधा मिळावी या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. उद्घाटन प्रसंगी बोलताना मान्यवरांनी या उद्यमशीलतेचे कौतुक केले. शहरातील तरुणांनी असे सकारात्मक व व्यावसायिक उपक्रम हाती घ्यावेत, असे प्रतिपादन करण्यात आले.
कार्यक्रमाला शहरातील मान्यवर, व्यावसायिक, पत्रकार बांधव तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उत्साही वातावरणात झालेल्या या उद्घाटन सोहळ्यामुळे शहराच्या खाद्यसंस्कृतीला नवा आयाम लाभणार आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.