माहिती अधिकार अधिनियम लोकशाही बळकट करणारा – उपायुक्त नंदू परळकर
इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि .३ :लोकशाही मजबूत करण्यासाठी माहिती अधिकार अधिनियमाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त नंदू परळकर यांनी केले. महानगरपालिका सभागृहात माहिती अधिकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.दरवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त सोमवारी महानगरपालिका सभागृहात अधिकारी-कर्मचार्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या उपस्थितीत झाला.
कार्यशाळेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे यांनी माहिती अधिकार अधिनियमाची विस्तृत माहिती दिली. माहिती अधिकाराबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पारदर्शक कामकाज करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहायक आयुक्त विजय राजापुरे यांनी केले. या कार्यशाळेसाठी सामान्य प्रशासन विभागाचे माहिती अधिकारी अजय जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रसंगी शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, मिळकत व्यवस्थापक श्रीकांत पाटील, समाज विकास अधिकारी सुनील शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, महिला बालकल्याण अधिकारी बेबी नदाफ, क्रीडा अधिकारी संजय शेटे, उपलेखापाल रामचंद्र कांबळे, भांडार अधीक्षक सुजाता दाभोळे, कर अधीक्षक दिपक खोत, गणेश शिंदे, अनिस पठाण, प्रशांत आरगे, विधी अधिकारी अॅड. भावना देवडा, विद्युत अभियंता इसरार बेग, उद्यान पर्यवेक्षक सुनील बेलेकर यांच्यासह महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.