इचलकरंजी: संजय आंबे
दि: 24 गेली दोन वर्षे कोरोनामुळे इचलकरंजीतील खो खो खेळाडू स्पर्धात्मक वातावरणापासून दूर आहेत. या खेळाडूंना पुन्हा एकदा आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन करता यावे व स्पर्धा खेळण्याची संधी मिळावी या हेतूने डायनॅमिक स्पोर्ट्स क्लब, इचलकरंजी यांनी कोल्हापूर खो खो असोसिएशनच्या मान्यतेने 19 वर्षाखालील मुलांच्या (255 इंडेक्स) खो खो स्पर्धांचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य श्री मदनराव कारंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी सन्मती बँकेचे चेअरमन श्री सुनील पाटील, डायनॅमिक स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष संजय कुडचे, कार्यवाह प्रा. शेखर शहा, राजू माने, प्रमोद बचाटे, खोखो प्रशिक्षक अमोल अडसुळे, हेमंत भांडवले, संभाजी बंडगर, डॉ. राहुल कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये इलेव्हन संघ, जयहिंद मंडळ, डायनॅमिक स्पोर्ट्स, शिवछत्रपती क्रीडा संघ, सी. आर. एस. एस. यू. क्रीडा, सरस्वती स्पोर्ट्स, शहीद सुतार स्पोर्ट्स, अब्दुललाट या संघांनी सहभाग नोंदविला आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.