आंबेडखुर्द येथे कुणबी भवनाचा २९ ऑक्टोबरला पायाभरणी सोहळा
अनेक दिग्गज मंत्र्यांची लाभणार उपस्थिती
कडवई:मुजीब खान
दि:25 संगमेश्वर तालुक्यातील आंबेडखुर्द येथे होत असलेल्या कुणबी भवनाचा पायाभरणी सोहळा शुक्रवार दि. 29 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या पायाभरणी सोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांची मांदियाळी असणार आहे.त्यामुळे संगमेश्वर शास्त्री पूल येथे पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे.
या पायाभरणी सोहळ्याला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अँड. अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री व उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना सचिव व खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, संगमेश्वर- चिपळूण विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम, कुणबी समाज नेते सहदेव बेटकर, शिवसेना सह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अविनाश लाड, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार सदानंद चव्हाण, किसान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पराग पाष्टे, बहुजन विकास आघाडी अध्यक्ष सुरेश भायजे, माजी रत्नागिरी जि. प. अध्यक्ष रोहन बने, माजी जि. प. अध्यक्षा रचनाताई महाडिक, ओबीसी समाज अध्यक्ष शरदचंद्र गीते, संगमेश्वर-देवरुख सभापती जया माने, जि. प.सदस्या माधवी गीते, संगमेश्वर-देवरुख उपसभापती परशुराम वेल्ये, कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष सीताराम शिगवण, आंबेड खुर्द सरपंच चंद्रकांत फणसे, माजी जि. प. अध्यक्ष संतोष थेराडे, कुणबी समाजोन्नती संघ संगमेश्वर- देवरुखचे अध्यक्ष कृष्णा हरेकर, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप पेंढारी, रत्नागिरी जि. प. सदस्य शंकर भुवड, कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष दत्ताराम लांबे, कुणबी भवन बांधकाम समिती, राज मंडळ डेकोरेटर्सचे कडवई अध्यक्ष विजय कुवळेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तमाम कुणबी बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.