Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.१:महानगरपालिकेच्या पहिल्या वहिल्या निवडणूकीतील महायुती उमेदवारांच्या प्रचार शुभारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वस्त्रनगरी इचलकरंजीत येणार आहेत, राज्यात सर्वप्रथम ते महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने इचलकरंजीत येत असून शनिवार ३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी मुख्य मार्गावर रोड शो होणार आहे, असल्याची माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुतीच्या सर्वच उमेदवारांनी भागाभागात नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचाराचा श्रीगणेश केला आहे. या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने शनिवार ३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इचलकरंजीत रोड शो आयोजित करण्यात आला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा येथून या रोड शोचा प्रारंभ होईल. तेथून श्री शिवतीर्थ, श्री शंभूतीर्थ, महात्मा गांधी पुतळा, राजवाडा चौक असा रोड शो होईल. याचठिकाणी सांगता होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन त्याचबरोबर आदर्श आचारसंहिता आणि नियमांचे काटेकोर पालन करणेसंदर्भात शहर भाजपा कार्यालयात बैठक झाली.बैठकीस प्रदेश संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, जिल्हा चिटणीस शेखर शहा, प्रकाश दत्तवाडे, तानाजी पोवार, इचलकरंजी पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते, पूर्व मंडल महिला अध्यक्षा सौ. सीमा कमते, पश्चिम मंडल अध्यक्षा सौ. सपना भिसे, जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, सौ. अलका स्वामी, सौ. रमा फाटक, आदींसह सर्वच प्रभागातील उमेदवार उपस्थित होते.
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.