रोटरी ट्रेड फेअरचा शानदार शुभारंभ

विविध स्टॉलचा समावेश : 5 जानेवारीपर्यंत आयोजन

इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१: दैनिक महासत्ता माध्यम प्रायोजित आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्यावतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील केएटीपी ग्राऊंडवर रोटरी ट्रेड फेअरचा गुरुवारी शानदार शुभारंभ झाला. रोटरी ट्रेड फेअरचे यंदाचे 25 वे वर्ष आहे.सदरचे ट्रेड फेअर सोमवार ता. 5 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

सदर ट्रेड फेअरचा शुभारंभ महासत्ताचे जाहिरात प्रतिनिधी चंद्रकांत मिठारी यांच्या हस्ते व रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय घायतीडक, रोटरी ट्रेड फेअरचे चेअरमन पंकज कोठारी, दैनिक महासत्ताचे प्रतिनिधी दिलावर मोमीन,अजय काकडे तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी रोटरी अंॅनसचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून तसेच फीत कापून करण्यात आला. स्वागत रोटरीचे अध्यक्ष संजय घायतीडक यांनी केले. दैनिक महासत्ताचे जाहिरात प्रतिनिधी चंद्रकांत मिठारी यांनी आपल्या मनोगतात, दैनिक महासत्ता व रोटरी क्लबच्या वतीने गेल्या 25 वर्षांपासून रोटरी फेअरचे आयोजन केले जात असून त्याचा फायदा स्थानिक व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही होत आहे.आसपासच्या शहरासह कर्नाटकातूनही मोठ्या संख्येने हे ट्रेड पाहण्यासाठी येत असल्याने कर्नाटकात हीट्रेड फेअर पोहोचला आहे. तेव्हा भविष्यात आणखीन मोठे करण्यासाठी दैनिक महासत्ता सहकार्य करेल,असे सांगितले. रोटरी ट्रेड फेअरचे अध्यक्ष पंकज कोठारी यांनी, प्रास्ताविकात गेल्या 24 वर्षापासून दैनिक महासत्ताच्या माध्यमातून यशस्वीरित्या रोटरी ट्रेड फेअर सुरू असून यंदाचे 25 वर्ष असून वेगळ्या पद्धतीने भरवण्यात आले असल्याचे सांगितले. रोटरी क्लबचे सेक्रेटरी पिरगोडा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास रोटरीचे सुनील सातपुते,प्रकाश गौड, नेमिनाथ कोथळे, वसंत पाटील, संजय खोत, महादेव खारगे,विक्रम बुचडे, महेंद्र मुथा ,सत्यनारायण धूत, मनीष मुनोत, अजित कुरडे, अभय येळरूटे, सुभाष तंगडी, रवींद्र नाकील, चंद्रकांत मगदूम, मुकुंद माळी, आनंदा माधव,श्रीनिवास दबडे, रोटरी ॲनसच्या अध्यक्षा सौ.मेघा येळरुटे,सौ.दीपा जठार,सौ. मनाली मुनोत, सौ.शर्मिला पाटील, सौ.उमा दाते आदी उपस्थित होते. यावेळी रोटरी ॲनसच्या आईस्क्रीम स्टॉलचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यंदाच्या ट्रेड फेअरमध्ये इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल वस्तू, गृहोपयोगी उत्पादने, गारमेंट मशिनरी, टू-व्हीलर बाईक, वॉटर प्युरिफायर, लेडीज व जेंट्स ड्रेस मटेरियल, इमिटेशन ज्वेलरी, एज्युकेशन, सोलर, ॲक्युप्रेशर बॉडी मसाज, व्यायामाची साधने, आयुर्वेदिक उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, विविध मसाले व मुखवास आदींचे स्वतंत्र विभाग असणार आहेत. न्यू व्हिनस इलेक्ट्रॉनिक्स, शिवम इंटरप्रायजेस, सोलर टेक्नॉलॉजी, श्रीजी निटिंग, युरेका फोर्ब्स, सुर्या वॉटर, पितांबरी, सोफा फर्निचर, बेंगलोर साडी यांसह अनेक नामांकित कंपन्यांचे स्टॉल्स या प्रदर्शनात सहभागी झाले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.