चौंडेश्वरी सूतगिरणीने सभासदांना दिली सूत दरवाढ फरकाची दिवाळी भेट

इचलकरंजी:मनोज खेतमर

         दि. 25 -चौंडेश्वरी सहकारी सूत गिरणीतर्फे सुतदर फरकाची रक्कम सभासदांना वितरण करण्यात आली, सोबत दोन किलो गुळाची ढेप देऊन सभासदांची दीपावली आणखीनच गोड केली.संस्थापक चेअरमन विठ्ठलरावजी डाके , संस्थापक व्हा.चेअरमन शंकरराव आदर्श, चेअरमन सुनील सांगले व्हा. चेअरमन श्रीकांत हजारे व संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम कल्पना टॉकीज इचलकरंजी येथे पार पडला.                              कार्यक्रमाची सुरवात श्री चोंडेश्वरी माता फोटो पूजनाने करण्यात आली.संस्थापक चेअरमन विठ्ठलराव डाके यांनी सर्व सभासदांना प्रथम दीपावलीच्या शुभेच्छा देत पंचवीस वर्षापूर्वी सभासदांनी आमच्यावरील ठेवलेल्या विश्वासाचे आभार मानत त्यास आम्ही सार्थक ठरलो असल्याचे आवर्जून सांगितले.
मध्यंतरीच्या काळात सूतगिरणी मध्ये बरेचसे चढ-उतार झाले. परंतु 2008 नंतर मी स्वतः लक्ष घालून प्रकल्प पूर्ती केली. प्रकल्प पूर्तीसाठी काढलेल्या कर्जापैकी संस्थेने 50% कर्जाची परतफेड केली आहे. त्यासोबत संस्थेच्या सभासदांना सुत दर फरकाच्या माध्यमातून लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे व यापुढेही देण्याचा प्रयत्न राहील.
यावेळी चौंडेश्र्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम कस्तुरे , तसेच संस्थेचे संचालक रामचंद्र मेटे, श्रीकांत कबाडे, जालंधर दाते, कृष्णात धुत्रे, शिवाजी रेडेकर, किशोर बोळाज, विलासराव साळमाळगे, विलास खिलारे, सुरेंद्र गदाळे व सौ उज्वला डाके व सूत गिरणी चे कार्यकारी संचालक मांतेश महाजन व सभासद व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.