पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने दिवाळी भेट वस्तुचे वाटप
इचलकरंजी– मनोज खेतमर
दि: २६ येथील पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने सलग ५ व्या वर्षी दिवाळी भेट वस्तुचे वाटप संघटनचे अध्यक्ष शिवगोडा खोत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना खोत म्हणाले कोरोनाच्या या आर्थिक अडचणीच्या काळात संघटनेला जाहिराती मधुन मिळणारे उत्पन्न कमी होत असताना देखील संघटना ज्या वृत्तपत्र विक्रेत्याच्या कष्टातून व एकजुटीने पुढे जात असताना जो विश्वास सभासद संघटनेवर दाखवत आहेत त्यातूनच या दिवाळीच्या भेट वस्तू देत असताना वृत्तपत्र विक्रेत्याच्या कुंटूबाशी नात घट्ट होताना दिसत असुन आज संघटना प्रत्येक घरा पर्यत पोहचली असुन अशाच प्रकारे एकजुटीने राहिल्यास जिल्ह्यात संघटन बांधणी मजबूत करुन कल्याणकारी मंडळासाठी वृत्तपत्र विक्रेत्यानी सज्ज रहावे असे आवाहन केले
सचिव अण्णा गुंडे यानी वृत्तपत्रा मधुन जाहिराती घालून वृत्तपत्र विक्रेते आपल्याला मिळ्णार्या रक्कमे मधुन काही भाग संघटनेकडे जमा करतात म्हनूनच सलग पाचव्या वर्षी दिवाळी भेट असताना विक्रेत्याचा अभिमान वाटत असुन असे सांगितले .
यावेळी वृत्तपत्र व्यवसायामध्ये ४० वर्षाहून अधिक काळ कामकेलेले सदाशिव पाटील,गोरीहर हिंगमिरे,सुखदेव लकडे याचा सेवानिवृती बददल सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्ंचालक अमर मुसडे,महेश बावळे,भालचंद्र कांबळे,विजय वाईगडे,कृष्णा हजारे,नारायण शिंदे ,महादेव चिखलकर,विशाल परिट अदिनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन व आभार शिवानंद रावळ यांनी मानले या कार्यक्रमाला बहुसंख्य विक्रेत्ये उपस्थीत होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.