आझाद ग्रुप कबनूरतर्फे ईद-ए-मिलाद कार्यक्रम उत्साहात
कबनूर :हबीब शेखदर्जी
दि:२६ : आझाद ग्रुप, कबनूर यांच्या वतीने मोहम्मद पैगंबर जयंती व ईद-ए-मिलाद निमित्त विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांसह कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी जगात शांतता, समता, बंधुता व एकता टिकविण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा असून, मोहम्मद पैगंबर यांचे विचार जपण्याचे आवाहन सत्यराज इंडस्ट्रीज टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष व उद्योजक केशभाई बागवान यांनी केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुंणूर पार्कचे डेव्हलपर हाफीज झाकीर कुंणूर यांनी प्रसारमाध्यमांमुळे जग जवळ आले असून, देशाचे नाव जगभरात उज्ज्वल करण्यासाठी युवा पिढीने शिक्षणाचे महत्त्व ओळखावे, असे सांगितले. शिक्षणातूनच परिवर्तन घडू शकते, त्यामुळे शिक्षणाचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बी. डी. पाटील होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील, उद्योजक मिलिंद कोले, राजूभाई असगर, अल्ताफ मुजावर, डॉ. आसिफ फकीर, मंडळाचे अध्यक्ष मुज्जामिल मुजावर आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे स्वागत आझाद ग्रुपचे संस्थापक कमाल मुजावर यांनी केले. प्रास्ताविक बी. जी. देशमुख यांनी केले. त्यांनी ईद-ए-मिलाद आणि मोहम्मद पैगंबर यांच्या कार्याची माहिती दिली.

यावेळी आझाद ग्रुपच्या वतीने साडी वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान शिबिराचा शुभारंभ तसेच मसाला दूध वाटप असे विविध सामाजिक उपक्रम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास बबनराव केटकाळे, सुलोचना कट्टी (माजी सरपंच), वैशाली कदम (ग्रामपंचायत सदस्या), गौराबाई काडाप्या (तालुका पंचायत सदस्या), अमोल पाटील (अध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस), जुबेरभाई कुंणूर, इस्माईल शेख, दादासो पाटील, संजय कट्टी, सुनील कांबळे, इम्रान हावेरी, सादिक जमादार, अबूबकर कुरणे, इम्रान पटाईत, मोहम्मद पानारी, जुबेर मुल्ला, अल्ताफ कुरणे, इम्रान शेख, फारुख मोमीन, सोहेल ऐनापुरे, इम्रान मोमीन, शाहिद अन्सारी, सोहेल नाईकवडे, शाहरुख फकीर, सलमान फकीर, फिरोज मुल्ला, सलीम नाईकवडे, मुईज पिरजादे, मुफीज पिरजादे, आजमत सारंग, हैदर शेख, वाहिद इनामदार, मुबारक मुजावर, हुसेन मुजावर आदी उपस्थित होते.

महिलांमध्ये सिमरन मुजावर, तरण्णूम नाईकवडे यांच्यासह अनेक महिलांनी सहभाग घेतला. गावातील पुरुष, महिला व मुलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शेवटी मुन्नाभाई पिरजादे यांनी आभार मानले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.