पुरग्रस्त नागरिकांना २०१९ प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी- अँड. अनिल डाळ्या
इचलकरंजी : संजय आंबे
- दि:२७ इचलकरंजी शहरामध्ये २०२१ मध्ये आलेल्या महापुरातील पुरग्रस्त नागरिकांना २०१९ प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी यासाठी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष अँड. अनिल डाळ्या याच्या नेतृत्वाखाली अप्पर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
२०१९ साली माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडू पुरग्रस्त भागासाठी भरघोस आर्थिक मदत मिळऊन दिली होती. त्यामध्ये पुरग्रस्त कुटुंबाला शहरी भागाला १५ हजार रुपये व ग्रामीण भागाला १० हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा केले होते. तसेच कारखानदार यांना ५० हजार रुपये, घर पडलेल्यांना १ लाख रुपये, व इतर छोटे मोठे व्यवसायकांना भरघोस आर्थिक मदत केली होती. परंतु आत्ताच्या सरकारने अनेक पुरग्रस्त भागातील लोकांचे पंचनामे केलेले नाहीत. ज्या लोकांचे पंचनामे केले आहेत त्या कुटुंबाला, अनेक व्यवसायकांना आजतागायत आर्थिक मदत केलेली नाही. या सरकारने तुटपुंजी आर्थिक मदत करून पुरग्रस्त भागातील लोकांची थट्टा केली आहे. कारखानदार,व्यवसायक यांना शे-पाचशे रुपये देऊन त्याची थट्टा करू नये. ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेले आहे अशानां २०१९ प्रमाणे आर्थिक मदत करावी. पुरग्रस्त भागातील कुटुंब, छोटे मोठे व्यवसायक, शेतकरी या सर्वांना तातडीने आर्थिक मदत करावी. या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष अॅड. अनिल डाळ्या व पुरग्रस्त भागातील नागरिकांच्या सोबत अप्पर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अरुण कुंभार, सचिन माळी, प्रवीण पाटील, प्रवीण रावळ, सागर कचरे, डॉ.राजु पुजारी, गणेश परिट, प्रमोद बचाटे, किरण दंडगे, राजेंद्र पाटील, सौ.अश्विनी कुबडगे, सौरभ चव्हाण, शुभम बरगे त्याचबरोबर पुरग्रस्त नागरिक उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.